जाहिरात
मराठी बातम्या / Viral / VIDEO - सलग 3 दिवस दूध पाजलं, आईचा थांबला श्वास; खड्ड्यातलं पिल्लू वाचलं अन् शेवटी झाला चमत्कार

VIDEO - सलग 3 दिवस दूध पाजलं, आईचा थांबला श्वास; खड्ड्यातलं पिल्लू वाचलं अन् शेवटी झाला चमत्कार

पिल्लाला वाचवण्यासाठी हत्तीणीची धडपड

पिल्लाला वाचवण्यासाठी हत्तीणीची धडपड

खड्डयात पडलेल्या पिल्लाला वाचवता वाचवता हत्तीणीचा श्वास थांबला. व्हिडीओचा शेवट पाहून तुमच्या डोळ्यात पाणी आल्याशिवाय राहणार नाही.

  • -MIN READ Delhi
  • Last Updated :

नवी दिल्ली, 24 एप्रिल : आईच्या प्रेमाला उपमा नाहीच. तिच्या प्रेमाची तुलना दुसऱ्या कुणाशीच करता येत नाही. फक्त माणूसच नव्हे तर प्राणी ही याला अपवाद नाहीत. माणूस असो वा प्राणी त्यांच्या एक सामान्य ते म्हणजे आईचं प्रेम सारखंच असतं. असाच एक इमोशनल व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतो आहे. एका हत्तीणीचा आपल्या पिल्लाला वाचवता वाचवता श्वास थांबला. पण म्हणतात ना आईचा जीव मुलं, पिल्लांमध्ये अडकलेला असतो. अगदी तसंच या व्हिडीओत पिल्लाने आईला स्पर्श करताच शेवटी चमत्कार झाला. हत्तींचा हा व्हिडीओ पाहिल्यानंतर तुमच्या डोळ्यात पाणी आल्याशिवाय राहणार नाही. हत्तीचं एक पिल्लू एका खड्ड्यात पडलं. खड्ड्यात चिखल होता, त्यामुळे पिल्लाला बाहेर पडता येत नव्हतं. पिल्लाला बाहेर काढण्यासाठी बरेच लोक मदतीसाठी धावून आले. हत्तीणही तिथंच होती. आपल्याला पिल्लाला सोडून जायला ती तयार नाही. आपल्या परीने पिल्लाला वाचवण्यासाठी जे शक्य आहे, ते सर्व ती करत होती.

News18लोकमत
News18लोकमत

खड्ड्यात पडलेलं पिल्लू बाहेर येण्याची धडपड करण्यात थकलं होतं, ते भुकेलंही होतं. शेवटी हत्तीणी त्या खड्ड्यावर आडवी राहिले. आपले पुढील दोन पाय खड्ड्यात ठेवून मागील दोन पाय दुमडून ती खड्ड्यावर आडवी राहिली आणि आपल्या पिल्लाला दूध पाजू लागली. पिल्लाला दूध पिता येईल आणि श्वास घेता येईल अशा स्थितीत ही हत्तीण होती. तिने आपला भार आपल्या पिल्लावर पडणार नाही, याची काळजी घेतली. बापरे! पिंजरा तोडून बाहेर आले 2 सिंह अन्…, सर्कशीत भयंकर घडलं; पाहा VIDEO असे सलग तीन दिवस दोन रात्र ती आपल्याला पिल्लाला दूध पाजत राहिली. तिच्यातही आता ताकद उरली नव्हती. पिल्लाला दूध पाजता पाजताच तिचा श्वास थांबला. कसंबसं करून हत्तीणाला सर्वांनी बाहेर काढलं. आता तिला वाचवण्याची धडपड सुरू झाली. सीपीआर देण्यात आला. तिला वाचवण्यासाठी सर्वकाही केलं गेलं. पण हत्तीणीत काहीच हालचाल नाही. ती मृतावस्थेतच होती. पिल्लूही खड्ड्यात आईला हाका मारत होतं. आईजवळ जाण्यासाठी आसुसलं होतं. आई मला एकट्याला सोडून जाऊ नको, असंच जणू ते सांगत होतं. अखेर खड्ड्यात पडलेल्या पिल्लाला बाहेर काढण्यात यश आलं. छोटा हत्ती जसा खड्ड्याबाहेर आला तसा तो धावत आपल्या आईकडे गेला. आईला उठवू लागला. पिल्लाचा स्पर्श होताच चमत्कार झाला. इतका वेळ इतक्या लोकांनी प्रयत्न करूनही ज्या हत्तीणीत जीव येत नव्हता, ती पिल्लाच्या फक्त स्पर्शानेच स्वतः उठून उभी राहिली. आपल्या पिल्लाला सुखरूप पाहून तिच्या चेहऱ्यावरही आनंद उमटला. पिल्लासह ती तिथून आपल्या घरी गेली. वासराला वाघ पकडणार इतक्यात गायीची एन्ट्री, 10 सेकंदात पलटला संपूर्ण गेम, पाहा Video @TansuYegen नावाच्या ट्विटर अकाऊंटवर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. त्यावर बऱ्याच कमेंट येत आहेत.

जाहिरात

तुम्हाला हा व्हिडीओ पाहताना काय वाटलं ते आम्हाला आमच्या सोशल मीडियाच्या कमेंट बॉक्समध्ये आपली प्रतिक्रिया देऊन नक्की सांगा.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात