जाहिरात
मराठी बातम्या / Viral / VIDEO - चवताळलेल्या हत्तीसमोर बिनधास्त नेली बाईक; तरुणांसोबत पुढे जे घडलं ते थरकाप उडवणारं

VIDEO - चवताळलेल्या हत्तीसमोर बिनधास्त नेली बाईक; तरुणांसोबत पुढे जे घडलं ते थरकाप उडवणारं

VIDEO - चवताळलेल्या हत्तीसमोर बिनधास्त नेली बाईक; तरुणांसोबत पुढे जे घडलं ते थरकाप उडवणारं

हत्तीने बाईकस्वार तरुणांचा पाठलाग करून त्यांना पळव पळव पळवलं आणि अखेर…

  • -MIN READ
  • Last Updated :

मुंबई, 24 फेब्रुवारी : हत्ती (Elephant video) दिसायला हवा अवाढव्य वाढला तरी तितकाच क्युट आणि शांतही असतो. त्यामुळे शक्यतो तसं त्याला फार कुणी घाबरत नाही. म्हणजे हत्ती आपल्याला काहीच करणार नाही, असं समजून बरेच लोक त्याच्या अगदी जवळ जातात. असाच प्रयत्न बाईकस्वार तरुणांनी केला. त्यानंतर त्यांची जी अवस्था झाली ती पाहूनच धडकी भरेल. हत्ती जितका शांत चांगलात त्यापेक्षा कितीतरी भयंकर तो चवताळल्यानंतर होतो. हे या व्हिडीओतून पाहायला मिळेल. एका रस्त्यावर हत्ती आला आणि त्यावेळी तरुणांनी थांबवण्याऐवजी बिनधास्तपणे त्याच्यासमोर बाईक नेली. त्यावेळी हत्ती चवताळला आणि त्यांच्यावर धावून आला. तेव्हा तरुणांनी तिथून पळ काढला. पण हत्तीने त्यांच्या पिच्छा सोडला नाही. हत्तीने पळणाऱ्या तरुणांचा पाठलाग केला. व्हिडीओत पाहू शकता दोन तरुण बाईकवर बसले आहेत. आधी हत्ती काहीच करणार नाही असं त्यांना वाटलं म्हणून ते आपली बाईक घेऊन त्याच्यासमोर जातात. हत्ती संतप्त होत त्यांच्या दिशेने धावून येतो. हे वाचा -  Video : सर्वांना सळो की पळो करून सोडलं; बैलांच्या कळपावर भारी पडला एकटा पक्षी तेव्हा बाईक चालवणारा तरुण आधी उतरतो आणि हातात हेल्मेट घेऊन पळ काढतो. त्यानंतर त्याच्या मागे बसलेला तरुणही घाबरून बाईकवरून उतरतो आणि पळू लागतो. हत्तीसुद्धा त्यांच्या मागे पळतो.

जाहिरात

दोन्ही तरुण जीव मुठीत धरून हत्तीपासून वाचण्यासाठी त्याच्यापासून दूर जाताना दिसतात. हत्ती त्यांना पळव पळव पळवतो. आता या तरुणांचं काही खरं नाही. हत्ती यांना चिरडणार असंच वाटतं. पण या तरुणांचं नशीब चांगलं म्हणून हत्ती शांत होते. काही अंतर त्यांच्या पाठलाग गेल्यानंतर तो थांबतो आणि तिथूनच माघार घेतो. हे वाचा -  कुत्र्याला वाचवण्यासाठी भिडला तरुण; VIDEO पाहून अनुष्का शर्मा म्हणाली, ‘पागल…’ @FredSchultz35 नावाच्या ट्विटर अकाऊंटवर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. त्यावर बऱ्याच कमेंट येत आहेत.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात