जाहिरात
मराठी बातम्या / Viral / भारीच! चक्क पाण्याच्या ड्रमपासूनच तयार केला Desi Ac; हा Jugaad video तुम्ही पाहायलाच हवा

भारीच! चक्क पाण्याच्या ड्रमपासूनच तयार केला Desi Ac; हा Jugaad video तुम्ही पाहायलाच हवा

भारीच! चक्क पाण्याच्या ड्रमपासूनच तयार केला Desi Ac; हा Jugaad video तुम्ही पाहायलाच हवा

एका व्यक्तीने चक्क पाण्याच्या ड्रमपासून हा देशी एसी तयार केला आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

मुंबई, 08 मार्च : हळूहळू थंडी गायब होऊन आता उकाडा जाणवू लागला आहे. उन्हाळा जसजसा जवळ येऊ लागला तसतशी पंखा, कुलर, एसीची गरज वाटू लागली आहे. त्यामुळे याची मागणीही वाढेल आणि मागणी वाढली म्हणजे त्याची किंमतही वाढणार. त्यामुळे आता कुलर, एसी घेणं तसं महागच. पण एका व्यक्तीने यावर उपाय शोधला आहे. त्याने जुगाड  (Desi Jugaad) करून स्वस्त आणि मस्त एसीच तयार केला आहे (Desi AC). देशी एसीचा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होतो आहे. एका व्यक्तीने सॉलिड जुगाड करून हा एसी म्हणा किंवा कुलर तयार करून दाखवला आहे. तुमच्याकडे असणाऱ्या साधनांमध्ये आणि अगदी कमीत कमी किमतीत तयार होणारा असा हा एसी आहे.  यासाठी तुम्हाला गरज आहे ती फक्त एका पाण्याच्या ड्रमची, पंखा, पाणी आणि एका जाळीची. हे वाचा -  Shocking! चिमुकलीने सापाची शेपटी धरून खेचलं आणि…; धडकी भरवणारा VIDEO व्हिडीओत पाहू शकता पाणी साठवण्याचा ड्रम आहे. त्याला चार बाजूने कापण्यात आलं आहे. एका बाजूला पंखा लावण्यात आला आहे. तर तीन बाजूंना जाळी लावली आहेत. ड्रमच्या वरून एखाद्या फाऊंटनसारखं पाणी बाहेर पडतं आहे. ड्रमवर एक स्विचही दिसत आहेत. या ड्रमची रचना अशा पद्धतीने करण्यात आली आहे, जणू काही हा कुलरच असवा.

जाहिरात

हा कुलरसारखा जरी दिसत असला तरी त्याची हवा एसीपेक्षा कमी नाही आहे. शिवाय एरवी आपण वापरत असलेला कुलर एकाच बाजूने हवा देत असतो. पण हा देशी कुलर मात्र चारही बाजूने हवा देईल याबाबत प्रश्नच नाही. हे वाचा -  कित्येक जण शोधून शोधून थकले; पाहा तुम्हाला तरी या फोटोमध्ये सापडतोय का मोबाईल desijugad7 नावाच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. लोकांना हा व्हिडीओ खूप आवडला आहे. तुम्हाला हा देशी कुलर किंवा एसी कसा वाटला आम्हाला आमच्या सोशल मीडियाच्या कमेंट बॉक्समध्ये आपली प्रतिक्रिया देऊन नक्की सांगा.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात