Home /News /viral /

Viral Video: मुलीनं असं काही केलं की संतापला हत्ती, थेट सोंड उचलून केला धक्कादायक प्रकार

Viral Video: मुलीनं असं काही केलं की संतापला हत्ती, थेट सोंड उचलून केला धक्कादायक प्रकार

काही लोक तर अशा प्राण्यांच्या अगदी जवळ जाऊन फोटो काढण्याचा प्रयत्न करतात आणि असाच प्रयत्न त्यांच्या जीवावरही बेतू शकतो. सध्या असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल (social media viral video) होतो आहे.

नवी दिल्ली, 24 मे: नॅशनल पार्क (National park) किंवा प्राणीसंग्रहायलात (Zoo) गेल्यानंतर प्राण्यांसोबत फोटो काढण्याचा मोह कुणालाच आवरत नाही. काही लोक तर अशा प्राण्यांच्या अगदी जवळ जाऊन फोटो काढण्याचा प्रयत्न करतात आणि असाच प्रयत्न त्यांच्या जीवावरही बेतू शकतो. सध्या असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल (social media viral video) होतो आहे. हत्तीचा फोटो काढणाऱ्या एका मुलीला हत्तीने जोरात सोंड मारली. हत्तीने एवढ्या जोरात सोंड मारली की तरुणी तिथेच खाली पडली. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या व्हिडिओमध्ये सात जणांचा एक ग्रुप हत्तीच्या समोर उभा असल्याचे पाहायला मिळत आहे. सर्वजण त्या महाकाय हत्तीकडे बघत हसत आहेत. व्हिडिओमध्ये दोन मुली हत्तीच्या सोंडेला स्पर्श करण्याचा प्रयत्न करताना दिसत आहेत. त्याचवेळी शेजारी उभी असलेली एक मुलगी तिचा स्मार्टफोन (Smartphone) काढते आणि गुपचूप हत्तीचा व्हिडिओ तयार करू लागते. परंतु तेवढ्यात हत्ती सोंडेने तिला फटकारतो. त्या मुलीला अजिबात कल्पना नसते की हत्ती सोंडेने तिच्यावर हल्ला करेल. हत्तीने सोंड मारताच अवघ्या काही सेकंदात ती मुलगी खाली पडणार असते, पण सोबत असलेला एक जण तिला पकडतो. या संदर्भात झी न्यूज हिंदीने वृत्त दिलंय. भ्रष्टाचाराच्या आरोपानंतर मोठी कारवाई, आरोग्यमंत्र्याची मंत्रिमंडळातून हकालपट्टी हत्तीने मुलीच्या चेहऱ्यावर फटकारल्यामुळे आजूबाजूला उभे असलेले सर्वजण घाबरतात आणि हत्तीपासून दूर जातात. यानंतर, मुलीचा जमिनीवर पडलेला फोन हत्ती आपल्या सोंडेने ओढण्याचा प्रयत्न करतो, पण तिथे उपस्थित असलेला एक मुलगा तो फोन उचलतो. हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. @cctv_idiots नावाच्या हँडलने हा व्हिडिओ ट्विटरवर शेअर केला आहे. हा व्हिडिओ आतापर्यंत 5 लाखांहून अधिक वेळा पाहिला गेला आहे आणि सात हजारांहून अधिक लोकांनी लाईक केला आहे. हत्ती (Elephant) हा महाकाय प्राण्यांपैकी एक आहे. हत्ती सहसा मनुष्य आणि मानवी वस्तीपासून दूर असतात. त्यांना फक्त त्यांची काळजी घेणारे माहूतच हाताळू शकतात. मात्र, पार्क किंवा प्राणीसंग्रहालयात जवळून प्राणी पाहिल्यानंतर प्रेक्षकांना फोटो आणि सेल्फी घेण्याचा मोह आवरत नाही. अशातच हे प्राणी चिडले तर त्यांचा राग प्रेक्षक किंवा पर्यटकांना असा ‘प्रसाद’ मिळतो. त्यामुळे तुम्हीदेखील असा काही प्रयत्न करत असाल तर काळजी घ्या. प्राण्यांसोबत असे फोटो काढणं, त्यांच्या अगदी जवळ जाणं धोक्याचं आहे. ते तुमच्या जीवावरही बेतू शकतं.
Published by:Pooja Vichare
First published:

Tags: Shocking viral video

पुढील बातम्या