मराठी बातम्या /बातम्या /Viral /..अन् हत्तीनं रस्त्यावर उभा राहात अडवल्या गाड्या; कारण जाणून तुम्हालाही वाटेल कौतुक..पाहा VIDEO

..अन् हत्तीनं रस्त्यावर उभा राहात अडवल्या गाड्या; कारण जाणून तुम्हालाही वाटेल कौतुक..पाहा VIDEO

जेव्हा हत्तीने खात्री केली की वाहने थांबली आहेत, तेव्हा त्याचा एक साथीदार हत्ती मागून रस्ता ओलांडण्यासाठी येतो. वाटेत उभ्या असलेल्या हत्तीपेक्षा तो आकाराने लहान आहे.

जेव्हा हत्तीने खात्री केली की वाहने थांबली आहेत, तेव्हा त्याचा एक साथीदार हत्ती मागून रस्ता ओलांडण्यासाठी येतो. वाटेत उभ्या असलेल्या हत्तीपेक्षा तो आकाराने लहान आहे.

जेव्हा हत्तीने खात्री केली की वाहने थांबली आहेत, तेव्हा त्याचा एक साथीदार हत्ती मागून रस्ता ओलांडण्यासाठी येतो. वाटेत उभ्या असलेल्या हत्तीपेक्षा तो आकाराने लहान आहे.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India

मुंबई 17 मार्च : आपल्या प्रियजनांच्या रक्षणासाठी माणूस कोणत्याही थराला जायला तयार असतो. निसर्गाने ही भावना प्राण्यांनाही दिली आहे. तोसुद्धा माणसांप्रमाणेच आपल्या कुटुंबाला वाचवण्यासाठी काहीही करू शकतो. तुम्ही सोशल मीडियावर असे अनेक व्हिडिओ पाहिले असतील जे याचे स्पष्ट उदाहरण देतात ज्यामध्ये प्राणी आपल्या कुटुंबाचं रक्षण करताना दिसतात. असाच एक व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे, ज्यामध्ये एक हत्ती आपल्या साथीदाराला रस्ता ओलांडण्यासाठी मदत करण्यासाठी असं काही करतो, जे तुमचंही मन जिंकेल.

बापरे! कुठला प्राणी नाही, तर स्वारीसाठी महिला थेट पक्षावरच बसली; पुढे काय झालं पाहा..VIDEO

अलीकडेच 'Wildest Kruger Sightings' या फेसबुक पेजवर हत्तीचा एक व्हिडिओ पोस्ट करण्यात आला आहे, जो लोकांना खूपच खास वाटत आहे. व्हिडिओ शेअर करत लिहिलं आहे की - "बघा, दुसरा हत्ती रस्ता ओलांडतोय, तर एक हत्ती वाहनांचा रस्ता अडवत उभा राहिला आहे." हा व्हिडिओ दक्षिण आफ्रिकेतील क्रुगर नॅशनल पार्कमधून जाणाऱ्या रस्त्यावरचा आहे.

व्हिडिओमध्ये एक जंगली भाग दिसत आहे, ज्यातून एक रस्ता जात आहे. त्यावर चार-पाच गाड्या उभ्या आहेत पण त्यांना पुढे जाता येत नाही. याचं कारण म्हणजे गाडीच्या अगदी समोर एक मोठा हत्ती उभा आहे ज्याने त्यांचा मार्ग अडवला आहे आणि त्यांना पुढे जाऊ देत नाही. जेव्हा हत्तीने खात्री केली की वाहने थांबली आहेत, तेव्हा त्याचा एक साथीदार हत्ती मागून रस्ता ओलांडण्यासाठी येतो. वाटेत उभ्या असलेल्या हत्तीपेक्षा तो आकाराने लहान आहे. व्हिडिओ पाहून असं वाटतं, की मोठा हत्ती त्याला मोठ्या भावाप्रमाणे मदत करत आहे.

या व्हिडिओला 21 लाखांहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत तर अनेकांनी कमेंट करून आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. एकाने म्हटलं की हे एक अद्भुत दृश्य आहे. तर एकाने म्हटलं की हा हत्ती भविष्यात नक्कीच वाहतूक पोलीस बनेल. आणखी एकाने कमेंट केली, की या व्हिडिओमध्ये हे प्राणी आपल्या कुटुंबाचे रक्षण कसे करतात हे दाखवण्यात आले आहे. इतरही अनेकांनी यावर निरनिराळ्या कमेंट केल्या आहेत.

First published:
top videos

    Tags: Elephant, Video Viral On Social Media