बंगळुरू, 09 जून : जंगल सफारीदरम्यान अनेकजण प्राण्यांना फक्त जवळून पाहत नाहीत तर प्राण्यांचे फोटो काढण्यासाठी स्वत:चा जीवही धोक्यात टाकतात. अशा परिस्थितीत जंगली प्राणी जवळ गेल्यावर संतप्त होतात आणि हल्ला करतात. असाच हा व्हिडिओ ज्यात हत्ती ने एका व्यक्तीवर हल्ला केला आहे. हा धक्कादायक व्हिडिओ व्हायरल होत आहे. हत्तीला पाहताच त्याच्यासोबत फोटो काढण्याचा मोह आवरला नाही. ही व्यक्ती गाडीतून उतरली आणि हत्तीसोबत फोटो काढायला गेली. व्यक्ती फोटो काढण्यासाठी जवळ येताच हत्ती चवताळला. त्याने त्या व्यक्तीवर हल्ला केला. व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता सुरुवातीला जंगलात एक हत्ती दिसतो. तो रागात आहे. मोठमोठ्याने ओरडून तो कुणाचा तरी पाठलाग करत आहे. इतक्यात हत्तीच्या पुढे एक व्यक्ती पळताना दिसते. VIRAL VIDEO - बिबट्याची शिकार करत होता सिंह; इतक्यात अशा प्राण्यांची एंट्री की, जंगलाचा राजा धूम ठोकून पळाला हत्तीपासून जीव वाचण्यासाठी ही व्यक्ती पळते खरी पण तिचा तोल जातो आणि ती धाडकन खाली कोसळते. तेव्हा हत्ती तिच्या मागेच असतो. पण सुदैवाने ती व्यक्ती कशी बशी स्वतःला सावरत उठते. व्यक्ती जंगलातून रोडवरील येते. तेव्हा सफारी गाडी तिथे येते, हत्ती हल्ला करत असलेल्या व्यक्तीला पाहून ती गाडी थांबते. गाडीतील सर्वजण दृश्य पाहून घाबरतात आणि आरडाओरडा करू लागतात. त्या व्यक्तीला गाडीत बसण्यासाठी बोलवतात. व्यक्ती धावत येते आणि त्या गाडीत बसते. सुदैवाने व्यक्ती पडते तेव्हा हत्तीही त्याच्या मागे धावत येत नाही तो एका ठिकाणी थांबतो आणि फक्त मोठ्याने ओरडतो. व्यक्ती गाडीत बसताच आणि गाडी तिथून निघून जाताच हत्ती शांतपणे पुन्हा जंगलात जाताना दिसतो. अबब! अवाढव्य हत्तीही करतात योगा; PHOTO पाहून तोंडात बोटं घालाल ट्वीटमध्ये दिलेल्या माहितीनुसार ही घटना कर्नाटकच्या चमराजनगरमधील आहे.
#Chamrajnagar: A tourist who ventured into the forest to capture images of the wild elephant. However, a wild elephant charged at him, and he narrowly escaped from being trampled by the elephant. The video of the incident has gone viral. Dept has ordered an inquiry. pic.twitter.com/1wKI4iKx0j
— Imran Khan (@KeypadGuerilla) June 8, 2023
हा व्हिडिओ @KeypadGuerilla या ट्विटर अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे.