नवी दिल्ली, 07 जून : सिंह म्हणजे जंगलाचा राजा. आता जंगलाचा राजा म्हटलं की त्याला कोणत्या प्राण्या ची असेल, जंगलात तोच सर्वात शक्तिशाली… बरोबर ना. पण तुम्हाला आश्चर्य वाटेल हा जंगलाचा राजाही एका प्राण्याला घाबरतो. असाच एक व्हिडीओ व्हायरल होतो आहे. ज्यात सिंह बिबट्याची शिकार करत होता. पण त्याचवेळी या प्राण्याची एंट्री झाली आणि सिंह शिकार सोडून आपला जीव मुठीत धरून पळाला. एक सिंह जंगलात बिबट्यावर हल्ला करत होता. बिबट्याच्या शिकारीच्या प्रयत्नात तो होता. पण त्याचवेळी तिथं असा प्राणी आला की सिंहही घाबरला. त्याने तिथून लगेच धूम ठोकली. या प्राण्यामुळे बिबट्याचा जीव वाचला आहे. सिंहाला बिबट्याची शिकार करताना पाहून हे प्राणी बिबट्याच्या मदतीसाठी धावून आले. आता असा कोणता प्राणी आहे, जे बिबट्याच्या मदतीसाठी आले आणि त्यांना पाहून सिंह घाबरला, हे पाहण्याची उत्सुकता तुम्हाला असेल. महिलेने सिंहाला स्पर्श करताच चवताळली सिंहिण; असा बदला घेतला की…; VIDEO VIRAL व्हिडीओत तुम्ही पाहू शकता एका झाडावर सिंह दिसतो आहे. तुम्ही व्हिडीओ नीट पाहिला तर झाडावर एक बिबट्याही आहे. सिंह बिबट्याची शिकार करायला आला आहे. बिबट्या आपला जीव वाचवण्यासाठी झाडाच्या उंचावर गेला आहे. सिंह त्याच्याजवळ पोहोचला पण जिथं बिबट्या आहे, तिथं मात्र तो पोहोचू शकत नाही. तरी त्याची धडपड सुरूच आहे. इतक्यात कोणत्या तरी प्राण्याचा आवाज येतो आणि सिंहाचं लक्ष तिथं जातो. तो नीट पाहतो. त्या प्राण्याला पाहताच सिंह बिबट्याला सोडून गुपचूप झाडावरून खाली उतरतो आणि तिथून पळ काढतो. तोपर्यंत तो प्राणी सिंहापर्यंत पोहोचलेला असतो. पण त्याने शिकार सोडली हे पाहून तसे ते प्राणी शांत होतात. पण तरी त्यांचं सिंहावर लक्ष होतं. अबब! अवाढव्य हत्तीही करतात योगा; PHOTO पाहून तोंडात बोटं घालाल आता हा प्राणी कोण, तर हत्ती. हो अवाढव्य हत्ती. तसं आपण त्यांना कधी ना कधी पाहतो, त्यामुळे जरी ते शरीराने अवाढव्य असले तर वाघ, सिंह, बिबट्या या प्राण्यांइतकी हत्तींची भीती वाटत नाही. पण अशाच हत्तीला सिंह मात्र घाबरतो. हे पाहून आश्चर्य व्यक्त केलं जातं आहे.
सिंह हत्तीला का घाबरला असावा, हे मात्र आता तुम्ही आम्हाला आमच्या सोशल मीडियाच्या कमेंट बॉक्समध्ये सांगा.