Home /News /viral /

निवडणुकीत दोन नेत्यांना समसमान मतं, मग असा लावला विजयी उमेदवाराचा निकाल

निवडणुकीत दोन नेत्यांना समसमान मतं, मग असा लावला विजयी उमेदवाराचा निकाल

एखाद्यावेळी लोकसभा किंवा विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीवेळी दोन्ही उमेदवारांना समान मतं मिळाली तर? अशावेळी भारतात पुन्हा मतमोजणी होते. त्यातून शंका बाकी राहिली तर पुन्हा मतदान होतं.

लंडन, 09 मे: जगभरात विविध पदांसाठी निवडणुका होत असतात तसंच त्या देशातील विधानसभा, संसदेसाठीही निवडणुका होतात. निवडणूक हा भारतात लोकशाहीचा उत्सवच मानला जातो. यात सामान्य नागरिक मोठ्या प्रमाणात सहभागी होतात. राजकारणी जोरदार प्रचार करतात. उमेदवारांचं नशीब इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रांत बंद होतं आणि निकालादिवशी विजयाचा गुलाल उधळला जातो. ही प्रक्रिया आपल्या सगळ्यांना माहीत आहे. पण एखाद्यावेळी लोकसभा किंवा विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीवेळी दोन्ही उमेदवारांना समान मतं मिळाली तर? अशावेळी भारतात पुन्हा मतमोजणी होते. त्यातून शंका बाकी राहिली तर पुन्हा मतदान होतं. ग्रामपंचायत स्तरावर समान मतं पडली तर चिठ्ठी टाकून निकाल लावला जातो. पण एक नवी बातमी समोर आली आहे ज्यात निवडणुकीच्या निकालासाठी क्रिकेटप्रमाणे टॉस करून म्हणजेच नाणेफेक करून निकाल लावण्यात आला. याबाबतचं वृत्त झी न्यूज हिंदीनं दिलं आहे. निवडणूक निकाल (Election Results) म्हणजे एक जबरदस्त प्रकरण असतं. कधीकधी अगदी कसून लढत होते तर कधीकधी अगदी कमी अंतरानी किंवा केवळ एका मतानेही उमेदवार विजयी किंवा पराभूत होतात. पण महत्त्वाच्या अशा दोन्ही उमेदवारांना मतदात्यांनी समान मतं दिली तर काय होतं? यूकेमध्ये स्थानिक निवडणुक निकालांत (Local Election Result) असंच घडलं. दोन उमेदवारांना समान मतं मिळाली. मग नाणेफेक करून विजेता ठरवण्यात आला. राज्यातल्या वीज संकटावर प्रश्न विचारताच ऊर्जामंत्र्यांनी काढला पळ, म्हणाले... संपूर्ण ब्रिटनमध्ये 5 मेला स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी लोक मतदानासाठी घराबाहेर पडले होते. साउथ वेल्समधील मॉनमाउथशायर काउंटी काउन्सिलमध्ये (Monmouthshire County Council in South Wales) मताधिक्य खूप कमी होतं. शेवटच्या मतगणनेनंतर लॉनफॉइस्ट फॉवर (Llanfoist Fawr) आणि गोविलॉन (Govilon) या दोन गटांत उमेदवारांना समान मतं मिळाली. आता काय करायचं हा प्रश्न निवडणूक अधिकाऱ्यांना पडला. मतदारांनी दोन्ही ठिकाणी उमेदवारांना समान मतं दिली होती; पण कुणा एकाला विजयी घोषित करणं गरजेचं होतं मग नाणेफेक करून विजेत्या उमेदवाराचं नाव घोषित करण्यात आलं. मॉनमाउथशायर काउंटी काउन्सिलमध्ये (Monmouthshire County Council) लेबर पक्षाच्या ब्रायोनी निकोलसन (Labour’s Bryony Nicholson) विरुद्ध कॉन्झर्व्हेटिव्ह पक्षाचे टॉमोस डेव्हिस अशी लढत होती. दोघांना 679 मतं मिळाली. नाणेफेक केल्यावर महिला उमेदवार निकोलसन यांनी त्यांचा अंदाज सांगितला; पण तो चुकला त्यामुळे टॉमोस डेव्हिस यांची काउन्सिलचे सदस्य म्हणून निवड झाली. डेव्हिस यांनी नाणेफेक जिंकून निवडणूकही जिंकली. या निवडणुकीतील नाणेफेक आणि विजेत्याचं नाव घोषित करण्याचा व्हिडिओ ट्विटरवर टाकण्यात आला तो प्रचंड व्हायरल झाला. 6 मेला डॅन बार्नेस या ट्विटर हँडलवरून हा व्हिडिओ शेअर करण्यात आला असून, हा 45 सेकंदांचा व्हिडिओ आतापर्यंत 6 हजार 20 जणांनी पाहिला आहे.
Published by:Pooja Vichare
First published:

Tags: Election, London

पुढील बातम्या