नवी दिल्ली, 21 जुलै : रायगडमधील घटनेमुळे संपूर्ण देश हादरला आहे. कुठे दरडी कोसळणं, कुठे पूर पावसाळ्यात देशभरात अशा किती तरी घटना घडत आहेत. अशात आता परदेशातून दुर्घटनेचा आणखी एक भयंकर व्हिडीओ समोर आला आहे. जिथं रस्ताच हवेत उडाला आहे. आजवर पृथ्वीचं कधीच पाहिलं नसेल असं रौद्र रूप. या भयानक दुर्घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. भूकंपामुळे धरतीला भेगा पडल्याचं तुम्ही पाहिलं असेल. पण या व्हिडीओत मात्र धरती फुटली आहे. बॉम्ब फुटावा तसा धरतीचा स्फोट झाला आहे आणि रस्ता हवेत उडाला असं दृश्य कदाचित आजवर तुम्ही कधीच पाहिलं नसेल. हा व्हिडीओ पाहून सर्वांनाच धडकी भरली आहे. नेमकं हे कोणतं संकट आहे, तेसुद्धा समजेना झालं आहे. landslide news : धरतीवरचा स्वर्ग समजला जाणाऱ्या कोकणात का होतं भूस्खलन? 4 दुर्घटनेत 84 बळी व्हिडीओत तुम्ही पाहू शकता, रस्त्यावर काही गाड्या आहेत, फुटपाथवर लोक आहेत. अचानक जमिनीतून स्फोटो होतो. संपूर्ण रस्ता वर उडाल्याचं दिसतो. त्यावेळी रस्त्यावर असलेल्या गाड्या हवेत उडतात. स्फोट इतका मोठा आहे की काही गाड्या रस्त्यावरून उडून त्या रस्त्याच्या कडेला गेल्या. तर काही आडव्या पडल्या. काय झालं, ते तिथल्या लोकांनाही समजेना सुरुवातीला सर्वजण सुन्न झालं पण नंतर मात्र जीव वाचवण्यासाठी पळू लागले. सर्वजण जीव मुठीत धरून तिथून पळताना दिसत आहेत. ही घटना दक्षिण आफ्रिकेतील जोहान्सबर्गमधील असल्याचं सांगितलं जातं आहे. जिथं हे घडलं तो भाग वर्दळीचा आहे. हे संपूर्ण दृश्य तिथल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झालं आहे. त्यानंतर हा व्हिडिओ सोशल नेटवर्किंग साइटवर व्हायरल होऊ लागला. अशाच एका युजरने ट्विटरवर हा व्हिडिओ शेअर केला आहे कवटीचे तुकडे, सांगाडा गायब, ठाण्यातील 2 वर्षीय चिमुकल्याच्या मृत्यूने खळबळ; त्याच्यासोबत काय घडलं? या दुर्घटनेत एकाचा मृत्यू झाला असून 40 हून अधिक लोक जखमी झाल्याचं सांगितलं जातं आहे. अनेक गाड्यांचंही नुकसान झालं आहे. या घटनेनंतर पोलिसांनी हा संपूर्ण परिसर सील केला आहे.
प्रशासनातील सर्व तज्ज्ञ आणि अधिकारी स्फोटाचं कारण शोधण्याचा प्रयत्न करत आहेत, परंतु पृथ्वीच्या आत एवढा मोठा स्फोट कसा झाला हे कोणालाही समजू शकलेलं नाही. तो कुठल्यातरी दैवी शक्तीचा उद्रेक होता की पृथ्वीचे उग्र रूप. जगातील भूवैज्ञानिकांनाही यामागील रहस्य शोधत आहेत.