जाहिरात
मराठी बातम्या / महाराष्ट्र / कवटीचे तुकडे, सांगाडा गायब, ठाण्यातील 2 वर्षीय चिमुकल्याच्या मृत्यूने खळबळ; त्याच्यासोबत काय घडलं?

कवटीचे तुकडे, सांगाडा गायब, ठाण्यातील 2 वर्षीय चिमुकल्याच्या मृत्यूने खळबळ; त्याच्यासोबत काय घडलं?

2 वर्षीय मुलाचा संशयास्पद मृत्यू.

2 वर्षीय मुलाचा संशयास्पद मृत्यू.

बेपत्ता झालेल्या मुलाच्या संशयास्पद मृत्यूमुळे ग्रामस्थ भयभीत झाले आहेत.

  • -MIN READ Maharashtra
  • Last Updated :

सुनील घरत/ठाणे , 21 जुलै : अवघ्या दोन वर्षांचा पियुष ऊर्फ घोलू, त्याची आई जंगलात लाकडं आणायला गेली. तोही तिच्यामागोमाग घराबाहेर पडला. पण तिला त्याची माहितीच नाही. घरी आल्यावर ती आपल्या लेकराला शोधू लागली. घरात तो नव्हता, इतरत्र कुठेच सापडला नाही. अखेर एका ठिकाणी त्याचं रक्ताने माखलेलं शर्ट आणि कवटीचे तुकडे दिसले पण सांगाडा मात्र गायब होता. पियुषच्या मृत्यूने एकच खळबळ उडाली. शहापुरातील खर्डी काजूपाडामधील ही घटना. काजूपाडा पिंपळपाडा आदिवासी वस्तीत राहणारा योगेश टबालेची पत्नी योगिता लाकूडफाटा आणण्यासाठी जंगलात निघाली. त्यांचा दोन वर्षांचा मुलगा पियुषही घरातून बाहेर पडला. पियुष आपल्या मागोमाग घराबाहेर आला हे योगिताला माहिती नव्हतं. तो घरीच आहे, असं समजून ती जंहलात लाकडं गोळा करत राहिली. आदिवासी तरुणाला मारहाण, अंगावर लघवीही केली; महिनाभराने घटना उघडकीस काही वेळाने योगिता घऱी परतली. पण पियुष काही तिला घरात दिसला नाही. तिने शेजाऱ्यांकडे पाहिलं त्यांच्याकजेही तो नव्हता. शेवटी परिसरातील पाडे वस्तीमध्येही तिने शोध घेतला. पण तो कुठेच सापडला नाही. अखेर खर्डी पोलीस ठाण्यात पियुष बेपत्ता झाल्याची तक्रार त्याच्या वडिलांनी नोंदवली. पोलिसांनी पियुषचा शोध सुरू केला. दोन वर्षांचा पियुष 26 एप्रिल रोजी बेपत्ता झाला होता. आता त्याचा मृत्यू झाल्याचं समजलं आहे. ज्या पद्धतीने त्याचा मृतदेह सापडला आहे, त्यामुळे ग्रामस्थ भयभीत झाले आहेत.  काल 20 जून रोजी कुंभयीचा पाडा डोंगरातील जंगलात पायथ्याशी पियुषने घातलेला शर्ट दिसला. बटण तुटलेला आणि रक्ताने माखलेला असा हा शर्ट होता. त्यानंतर लहान मुलाच्या कवटीचे चार ते पाच तुकडेही तिथं पसरले होते पण सांगाडा मात्र नव्हता.   मुसळधार पावसात जंगलातील झाडाझुडुपात पोलिसांनी शोध घेतला पण सांगाडा सापडला नाही. तब्बल 7 महिन्यांपासून पुजारी बनून राहत होता मुस्लिम तरुण, घटना समोर येताच उडाली खळबळ खर्डी पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे. दरम्यान ग्रामस्थांनी पियुषचा वापर तांत्रिक विद्येसाठी झाला असावा  किंवा जंगलातील हिंस्र प्राण्यांनी पियुषला मारून खाल्लं असेल अशी भीती ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात