मुंबई, 2 ऑक्टोबर : यंदा कोरोनाचे निर्बंध हटल्यामुळे गणेशोत्सवानंतर आता नवरात्री उत्सव देखील मोठया प्रमाणात साजरा केला जात आहे. या वर्षी नवरात्रीत दांडिया उत्सवाची धम्माल पाहायला मिळत आहे. दांडिया खेळायला जायचं म्हणजे परफेक्ट रेडी होणे आलच. त्यामुळे काही महिला ब्युटी पार्लरमध्ये जाऊन खास मेकअप आपण इतरांपेक्षा कसे वेगळे दिसू शकतो यासाठी करून येतात. पण काही महिलांना ब्युटी पार्लरमध्ये जाऊन मेकअप करणे शक्य नसते. अशाच महिलांसाठी मेकअप आर्टिस्ट चंद्रकांत रणखांबे यांनी घरच्या घरी सुंदर मेकअप कसा करता येऊ शकतो याच्या काही सोप्या टिप्स सांगितल्या आहेत. कसा करणार चेहऱ्याचा मेकअप? सुरुवातीला चेहरा स्वच्छ करून मेकअप साठी तयार ठेवावा. त्यानंतर चेहऱ्याच्या स्किन टोन नुसार कलर करेक्टरने चेहऱ्यावरील डाग, डोळ्यांखालील वर्तुळ सारख्या रंगाची करावी. त्यावर कंसीलर लावावे आणि फाउंडेशन लावून घ्यावे व सेटिंग पावडर लावून चेहरा पुढच्या प्रक्रिये साठी तयार ठेवावा. चेहऱ्यावरील गालाचा चीकबोन वर ब्लश लावून घ्यावं. त्यानंतर चेहऱ्याचा काही भाग हायलाईट करावा. National Mud Pack Day : तेलकट आणि निस्तेज त्वचेपासून मिळेल सुटका, अशा पद्धतीने वापरा मड फेस पॅक कसा करणार डोळे व ओठांचा मेकअप? डोळ्यांवर फाउंडेशन लावून घ्यावे. त्यानंतर जेल लाइनरचा वापर करून ते ब्लेंडरने ब्लेंड करावे. आयशॅडोज वापरून सुद्धा तुम्ही डोळ्यांचा साधा मेकअप करू शकता. ओठांवर लिपलायनर लावून घ्यावे जेणेकरून लिपस्टिक ओठांच्या बाहेर जाणार नाही. लिपस्टिक लावून घ्यावी. जर लिपस्टिक डार्क झाली असेल तर त्यावर फेंट शेड लावून ती लाईट करून घ्यावी.
कसा करणार दांडिया स्पेशन टिकली लुक? काळे गंध किंवा लाईनरचा वापर करून टिकल्या ठेवाव्या. उभ्या - आडव्या रेघा, थेंब, स्वस्तिक, पान, फुल, चंद्र, चांदनी, सूर्य या डिझाईन तुम्ही बनवू शकता. डोळ्यांच्या बाजूला, कपाळावर, हनुवटीवर, गळ्यावर, हातावर या डिझाईन तुम्ही बनवू शकतात.