फ्लोरिडाच्या ब्रॉवर्ड काऊंटी इथल्या एका खटल्याच्या व्हर्चुअल सुनावणीदरम्यान एक धक्कादायक प्रकार घडला. हा प्रकार कळताच जगभरातले नेटिझन्स एकीकडे या प्रकरणाची खिल्ली उडवत असकामा संतापही व्यक्त करीत आहेत. त्याचं झालं असं, की एका माणसावर दरोडा टाकण्याचा प्रयत्न केल्यामुळं लुटीचा गुन्हा दाखल झाला होता. त्या खटल्याचा निकाल न्यायधीश वाचून दाखवत होते तेव्हा हा आरोपी चक्क न्यायाधीश बाईंसोबतच फ्लर्ट करायला लागला.
डेमेट्रिस लेविस असं त्या आरोपीचं नाव आहे. तो न्यायाधीश तबिथा ब्लॅकमॉन यांच्यासमोर सुनावणीदरम्यान हजर झाला. त्याच्यावर एका मोठ्या घरात तीन लहान मुलं झोपलेली असताना लुटीसाठी घुसल्याचा आरोप होता. न्यायाधीश ताबिथा शिक्षा सुनावत असतानाच हा लेविस चक्क न्यायाधीश बाईंशी फ्लर्ट करू लागला. तो म्हणू लागला, 'जज, तुम्ही खूप सुंदर आहात. तुम्ही किती सुंदर आहात हे मी तुम्हाला सांगितलंच पाहिजे. आय लव्ह यू! आय लव्ह यू!'
हे ही वाचा- नशा करणं पडलं महागात, वयाच्या 22 व्या वर्षी आलं म्हातारपण; पाहा PHOTOS
सुनावणीदरम्यानचा हा लहानसा तुकडा आता नेटवर व्हायरल झाला आहे. लाखो लोकांनी तो पाहिला आहे. दुर्दैवानं न्यायाधीशांवर या फ्लर्टींगचा काहीच प्रभाव पडला नाही. त्यांनी सेकंदभरासाठी आश्चर्यमिश्रित स्मित तेवढं केलं. 'फ्लर्टींग तुला कुठेही फायद्याचं ठरेल मात्र इथे अजिबातच नाही.' असं न्यायाधीशांनी निक्षून सांगितलं. न्यायाधीश बाईंनी लेविसला पुढं सुनावणी करत दोषी ठरवलं. आणि 5000 डॉलर्सचा दंडही सुनावला. लेविसनं आधीच चार वर्ष तुरुंगात घालवली आहेत.
लेविसनं केलेली फ्लर्टींग त्याच्यासाठी निरुपयोगी ठरली असली तरी त्यातून नेटकऱ्यांचं मात्र चांगलंच मनोरंजन झालं आहे. लोकांनी या व्हिडिओवर मजेदार कमेंट्स केल्या आहेत. एकानं लिहिलं आहे, हा आरोपी प्रेमी म्हणून खरोखर प्रामाणिक असेल तर त्यानं पुन्हा एकदा नवा गुन्हा करुन न्यायाधीश बाईंसमोर गेलं पाहिजे. आणि हो, कुणाला एखादी वाईट प्रेम कथा लिहिण्याची असेल तर सांगा. इथं मस्त कथाबीज आपल्याला सापडलं आहे
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Viral video.