नवी दिल्ली, 01 जुलै : एखादी महिला गरोदर असल्यावर तिच्या शरिरात अनेक हार्मोन्स चेंज होत असतात. गरोदरपणात बऱ्याच समस्यांनाही महिलांना तोंड द्याव लागतं. प्रत्येक महिलेला वेगवेगळा त्रास सहन करावा लागतो. नुकतंच एका महिलेनं तिला गरोदपणात काय त्रास झाला याविषयी सांगितलं. महिलेच्या अनुभवाने सर्वाना धक्काच बसला कारण अशा घटना यूपूर्वी कधी समोर आलेल्या नाहीत. महिलेनं दावा केला आहे की, गरोदरपणात तिला खूप उलट्या झाल्या. उलट्यानंतर तिचे सर्व दात पडले. हे ऐकून तुम्हाला आश्चर्य वाटेल मात्र याविषयी महिलेनं स्वतः खुलासा केला आहे.
26 वर्षीय लुईस कुपर ही फ्रान्समधील स्की रिसॉर्टमध्ये आया म्हणून काम करते. ती 2017 मध्ये प्रेग्नेंट झाली. प्रेग्रेंट होतात आठवड्याभराती ती आजारी पडली. तिला हायपेरेमेस्स ग्रॅव्हिडारम या आजाराचं निदान झालं. हा एक मॉर्निंग सिकनेस हा दुर्मिळ आजार आहे. चाकाच्या बॅग्सवर या ठिकाणी बंदी, नियम मोडल्यास भरावा लागणार दंड लुईसनं सांगितलं की उलट्या करुन अॅसिडीटीमुळे तिचे दात खराब झाले होते. त्यामुळे तिला दात काढण्यास सांगितलं होतं. तिला एक मुलगा झाल्यानंतर तिची परिस्थिती नियंत्रणात आली. मात्र शरिरात अस्वस्थपणा कायम होता. आता तिच्याकडे कॉस्मेटिक दात आहेत मात्र ती अनेक खाद्यपदार्थ टाळते. हे भावनिकदृष्ट्याही थकवणारं असल्याचं लुईस म्हणाली.