जाहिरात
मराठी बातम्या / Viral / चाकाच्या बॅग्सवर या ठिकाणी बंदी, नियम मोडल्यास भरावा लागणार दंड

चाकाच्या बॅग्सवर या ठिकाणी बंदी, नियम मोडल्यास भरावा लागणार दंड

चाकाच्या बॅग्सवर या ठिकाणी बंदी

चाकाच्या बॅग्सवर या ठिकाणी बंदी

लोक रोज कुठे ना कुठे प्रवास करतात. प्रवासादरम्यान सामानासाठी वेगवेगळ्या बॅग वापरतात. आजकाल तर सामान उचलायला जास्त कष्ट लागू नये म्हणून चाकाच्या बॅग्स निघाल्या आहेत.

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

नवी दिल्ली, 01 जुलै : लोक रोज कुठे ना कुठे प्रवास करतात. प्रवासादरम्यान सामानासाठी वेगवेगळ्या बॅग वापरतात. आजकाल तर सामान उचलायला जास्त कष्ट लागू नये म्हणून चाकाच्या बॅग्स निघाल्या आहेत. त्यामुळे जड सामानही नेण्यात अडचण होत नाही. कंपन्या आता हळू हळू अजून स्टायलिश बॅग्स मार्केटमध्ये आणत आहे. मात्र असाही एक देश आहे जिथे चाकाच्या बॅग्स म्हणजेच व्हील्स लगेजवर बंदी घातली आहे. हे ऐकून तुम्हाला कदाचित आश्चर्य वाटेल मात्र ही गोष्ट खरी आहे. युरोपियन देश क्रोएशियामधील डबरोव्हनिक शहर आपल्या सौंदर्यासाठी प्रसिद्ध आहे. हे शहर खूप जुने असून येथील इमारती, रस्ते हे सर्व पुरातन आहेत. येथे दरवर्षी लाखो पर्यटक येतात. तितक्या ट्रॅव्हल बॅग किंवा सुटकेस असतात ज्यात लोक त्यांचे सामान ठेवतील. परंतु डबरोव्हनिकच्या प्रशासनाने शहरात चाकांच्या सूटकेसवर बंदी घातली आहे. ही बंदी सध्या चर्चेचं कारण ठरत आहे. न्यूयॉर्क पोस्ट वेबसाइटने याविषयी वृत्त दिलंय.

News18लोकमत
News18लोकमत

शहरातील अनेक गल्ल्या आणि रस्ते दगडाचे बनलेले आहेत आणि त्यामुळे त्याला प्राचीन स्वरूप प्राप्त झाले आहे. या रस्त्यांवर चाकांच्या बॅगा घेऊन पर्यटक चालतात तेव्हा मोठा आवाज होतो. रात्रीच्या वेळीही तेथील स्थानिक लोकांना या आवाजामुळे झोप लागत नाही. या गैरसोयीला सामोरे जाणाऱ्या नागरिकांनी या समस्येवर तोडगा काढण्यासाठी प्रशासनाकडे तक्रार केली. यानंतर शहराचे महापौर मातेओ फ्रँकोविक यांनी एक नवीन नियम लागू केला. Kenya Accident: विदर्भ ट्रॅव्हल्सनंतर आणखी एक भीषण अपघात, 50 लोकांचा मृत्यू या नवीन नियमानुसार शहरात फक्त चाके असलेल्या बॅग्सवर बंदी घातली. जर कोणी या नियमाचे उल्लंघन केले आणि बॅग घेऊन फिरताना दिसले तर त्याला 23 हजार रुपये दंड भरावा लागेल. रेस्पेक्ट द सिटी अभियानांतर्गत हा नियम करण्यात आला आहे. नोव्हेंबरपासून लोकांना आपले सामान शहराबाहेर जमा करून शहरात यावे लागेल. या नियमाची सध्या सोशल मीडियावर चर्चा रंगली आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात