जाहिरात
मराठी बातम्या / Viral / वडील मुलावर इतके संतापले की कुत्र्यालाच केलं संपत्तीचा मालक, नेमकं प्रकरण काय?

वडील मुलावर इतके संतापले की कुत्र्यालाच केलं संपत्तीचा मालक, नेमकं प्रकरण काय?

व्हायरल

व्हायरल

चित्रपटासारखाच प्रकार सध्या समोर आला असून एका व्यक्तीने मुलाचा राग आल्यामुळे जमीन आपल्या विश्वासू कुत्र्याच्या नावावर केली आहे. सध्या ही घटना चांगलीच चर्चेत आली आहे.

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

नवी दिल्ली, 17 फेब्रुवारी : बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमारचा ‘एंटरटेंमेंट’ चित्रपट सर्वांना माहितीच असेल. या चित्रपटातील एका श्रीमंत व्यक्तीनं त्याची संपूर्ण मालमत्ता आपल्या विश्वासू कुत्र्याच्या नावावर केली होती. चित्रपटासारखाच प्रकार सध्या समोर आला असून एका व्यक्तीने मुलाचा राग आल्यामुळे जमीन आपल्या विश्वासू कुत्र्याच्या नावावर केली आहे. सध्या ही घटना चांगलीच चर्चेत आली आहे. मध्य प्रदेशातील छिंदवाडा येथील चांद तहसीलमध्ये एका शेतकऱ्याने असे काम केले की सगळेच अवाक् झाले. शेतकऱ्याला आपल्या मुलाचा इतका राग आला की त्याने धक्कादायक निर्णय घेतला. त्यांनी आपली 2 एकर जमीन आपल्या विश्वासू कुत्र्याच्या नावे करून दिली. ही घटना सध्या सोशल मीडियावरही चर्चेत आली आहे. हेही वाचा -  रेस्टॉरंटमध्ये मुलीला प्रियकरासोबत पकडलं त्यानंतर धू धू धूतलं, Video तुफान व्हायरल मुलाने आपल्या वडिलांची आणि आईची काळजी घेतली नाही. यामुळे संतप्त झालेल्या शेतकऱ्याने असा निर्णय घेतला. शेतकऱ्याने आपल्या मुलाला अनेकवेळा समजावण्याचा प्रयत्नही केला होता की बेटा, आईला सांभाळ. वडिलांच्या समजूतीनंतरही त्यांनी वडिलांची आणि आईची काळजी घेतली नाही. त्यामुळे संतप्त झालेल्या शेतकरी ओम नारायण वर्मा यांनी त्यांच्या एकूण संपत्तीपैकी दोन एकर जमीन त्यांच्या विश्वासू कुत्र्याला दिली. जॅकी असे या शेतकऱ्याच्या कुत्र्याचे नाव आहे.

News18लोकमत
News18लोकमत

दरम्यान, शेतकऱ्याकडे एकूण 18 एकर जमीन होती. त्यातील 2 एकर जमीन या शेतकऱ्याने कुत्र्याच्या नावावर आणि उर्वरित मालमत्ता पत्नी चंपा यांच्या नावावर केली. शेतकऱ्याने मृत्युपत्रात लिहिले आहे की, ‘माझी पत्नी आणि माझा पाळीव कुत्रा माझी सेवा करतात, त्यामुळे मी जिवंत असताना ते मला सर्वात प्रिय आहेत’. त्यांनी मृत्युपत्रात पुढे लिहिले आहे की, “माझ्या मृत्यूनंतर संपूर्ण मालमत्ता आणि जमीन-संपत्ती पत्नी चंपा वर्मा आणि विश्वासू कुत्रा जॅकीला मिळेल.” तसेच, जो कुत्र्याची सेवा करेल तो मालमत्तेचा पुढचा वारस मानला जाईल.’’ ही बातमी मध्य प्रदेशात आगीसारखी पसरली. या घटनेमुळे अनेकांनी अक्षय कुमारच्या चित्रपटाची आठवण झाल्याशिवाय राहणार नाही.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात