Home /News /viral /

मॅराथॉनमध्ये आकर्षणाचं वेगळंच केंद्र, बदकानं वेधून घेतलं चाहत्यांचं लक्ष; पाहा VIDEO

मॅराथॉनमध्ये आकर्षणाचं वेगळंच केंद्र, बदकानं वेधून घेतलं चाहत्यांचं लक्ष; पाहा VIDEO

मॅरेथॉनमध्ये धावणाऱ्या (Duck becomes center of attraction in marathon race)स्पर्धकांऐवजी एका बदकानेच सर्वांचं लक्ष वेधून घेतल्याची घटना नुकतीच घडली.

  मॅरेथॉनमध्ये धावणाऱ्या (Duck becomes center of attraction in marathon race)स्पर्धकांऐवजी एका बदकानेच सर्वांचं लक्ष वेधून घेतल्याची घटना नुकतीच घडली. साधारणतः मॅरेथॉन स्पर्धा पाहण्यासाठी आलेले प्रेक्षक हे त्या स्पर्धेत येणाऱ्या दिग्गज खेळाडूंना पाहण्यासाठी येत असतात. त्यांची स्टाईल, त्यांचा वेग आणि एकंदर स्पर्धा जिंकण्यासाठी ते करत असलेली स्ट्रॅटेजी यासाठी मॅरेथॉनला गर्दी जमत असते. मात्र नुकतीच एका अनोखी घटना समोर आली आहे. या मॅरेथॉनमध्ये स्पर्धकांच्या जोडीने धावणाऱ्या एका बदकानंच सगळ्यांच्या नजरा वेधून घेतल्या. हा व्हिडिओ सध्या जोरदार व्हायरल होत आहे.
  रस्त्यावर बदक न्यूयॉर्कमध्ये 50 वी मॅरेथॉन स्पर्धा नुकतीच पार पडली. गेल्या वर्षी कोरोनामुळे ही स्पर्धा रद्द करण्यात आली होती. मात्र यंदा या स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं. या स्पर्धेत सहभाग घेतलेल्या एकाने पाळलेलं हे बदक त्याच्यासोबत मॅरेथॉनमध्ये धावताना दिसलं. त्याचं सर्वांना इतकं कौतुक वाटलं की सर्वांचे मोबाईल आणि कॅमेरे स्पर्धक सोडून या बदकावर केंद्रीत झाले. बदकानंही घेतली धाव इतर स्पर्धकांप्रमाणे बदकानेही मॅरेथॉनमध्ये सहभाग घेतला की काय, असं वाटण्यासारखं चित्र होतं. कारण बदकदेखील इतर स्पर्धकांसोबत अगदी जीव तोडून धावत असल्याचं दिसत होतं. अनेकांनी आपल्या कॅमेऱ्यात ही घटना कैद केली आणि सोशल मीडियावर पोस्ट केली. या व्हिडिओत पायात लाल रंगाचे बूट परिधान करून मोठ्या ऐटीत बदल रनिंग ट्रॅकवर धावताना दिसत आहे. मैदानात उपस्थित प्रेक्षकांनी टाळ्या वाजवत आणि घोषणा देत या बदकाला प्रोत्साहन देण्याचा प्रयत्न केला. हे वाचा- मोठी बातमी! द्वारकामध्ये कोट्यवधींच ड्रग्ज जप्त; ठाण्यातील भाजी विक्रेत्याला अटक सोशल मीडियावर कौतुक बदकानं मॅरेथॉनमध्ये घेतलेल्या सहभागाचं सोशल मीडियावर जोरदार कौतुक होत आहे. बदकाची धाव आपल्याला भलतीच आवडल्याची प्रतिक्रिया नेटिझन्सनी दिली आहे.
  Published by:desk news
  First published:

  Tags: Shocking video viral, Viral video.

  पुढील बातम्या