जाहिरात
मराठी बातम्या / Viral / अनन्या आणि विघ्नेशचा शुभविवाह... हे फक्त लग्न नाही अनेकांसाठी एक अशेचा किरण

अनन्या आणि विघ्नेशचा शुभविवाह... हे फक्त लग्न नाही अनेकांसाठी एक अशेचा किरण

अनन्या आणि विघ्नेश

अनन्या आणि विघ्नेश

अनन्या आणि विघ्नेश हे दोघेही डाउनसिंड्रोम नावाच्या आजाराने ग्रस्त आहे. त्या दोघांचं कदाचित कधी लग्नच होणार नाही असं त्यांच्या घराच्यांना वाटलं होतं. परंतु नियतीला काही वेगळंच मान्य होतं.

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

गोविंद वाकडे, प्रतिनिधी पुणे, 12 जुलै : एकदा निवडलेला जोडीदार, मित्र किंवा प्रियकराला आपण त्याच्या गुण-दोषांसह स्विकारायला हवां तरच आपल्या संसाराची गाडी अगदी सुरळीच चालते. अशीच काहीशी गोष्ट सोशल मीडियावर समोर आली आहे. ज्याबद्दल जाणून तुम्हाला नक्कीच कौतुक करावसं वाटेल. भारतात पहिल्यांदाच विवाहबद्ध झालेल्या गतीमंद अनन्या आणि विघ्नेशची ही काहणी आपल्याला हेच शिकवते. अनन्या आणि विघ्नेश हे दोघेही डाउनसिंड्रोम नावाच्या आजाराने ग्रस्त आहे. त्या दोघांचं कदाचित कधी लग्नच होणार नाही असं त्यांच्या घराच्यांना वाटलं होतं. परंतु नियतीनं त्यांना भेटवलं आणि जुळली त्यांची लग्नगाठ. ते ही एका संस्थेमार्फत, ज्या संस्थेला बनवण्याचं काम स्वत: अनन्याची आई आणि बाबांनी केलं होतं. ज्यामुळे आता इतर अनेक गती मंद मुलांची लग्न होऊ शकणार आहेत. अनन्याची आई डॉक्टर तेजस्विता यांनी सांगितले की, ‘‘अनन्याचां जन्म झाला तेव्हा आम्ही खूप आनंदात होतो पण काहीच दिवसात आम्हाला ती गतिमंद असल्याचं कळलं आणि आम्ही दोघेही हताश झालो पण मी त्याच वेळी ठरवलं अनन्याला जगातले सगळे आनंद द्यायचे तिला शालेय शिक्षण तर दिलंच , पण मला वाटते ती गतिमंद मुलींमध्ये भारतातील पहिली वाहन चालक असावी एव्हढच नाही तर ती एक वर्ष आमच्यापासून वेगळी राहत होती जेवण बनविण्यापासून ते दैंनदिन सगळी कामे एकटीच करायची तेव्हाच मला विश्वास आला की ती आता विवाहयोग्य झालीय.’’ पुढे अनन्याची आई म्हणाली, “आम्ही अनन्यासाठी मुलगा शोधायला सुरवात केली तेव्हा आम्हाला धक्का बसला मागचे तीन दशकं आम्ही नवरा बायको गतिमंद मुलांसाठी काम करतोय आमची संस्था आहे पण आम्हाला कळलं की गतिमंद मुलांसाठी एकही विवाह संस्था काम करत नाही किंवा लग्नच लावली जात नाहीत, मग मी ठरवलं हे आपण करायचंच आणि एका online खासगी विवाह संस्थेच्या व्यवस्थापकाशी संपर्क साधला आणि बऱ्याच विनंती नंतर त्यांनी down syndrome विवाहसाठी नोंदणी सुरू केली, काही दिवसातच विघ्नेशच्या कुटुंबीयांनी आमच्याशी संपर्क साधला आणि आम्ही दोन्ही कुटुंब तब्बल 1 वर्ष भेटत राहलो. “एके दिवशी अनन्या आणि विघ्नेश समुद्रात खेळून आल्यावर बीचवर बसले तेव्हा अनन्या विघ्नेशच्या पायाला लागलेली वाळू काढत होती ते दृश्य आम्ही दुरून बघितलं आणि नकळत माझ्या डोळ्यातून आनंद अश्रू वाहू लागले मला कळलं होतं अनन्याला आता तिचा साथीदार मिळाला आहे तो तिची काळजी घेईल आणि तिथेच आम्ही लग्नाची तारीख ठरवली.” अनन्याची आई म्हणाली.

News18

अखेर अनन्या आणि विघ्नेशच्या लग्नाचा दिवस आला होता. या लग्नाला अनन्याच्या कुटुंबीयांनी त्यांच्या संपर्कात असलेल्या आणि संस्थेशी जोडल्या गेलेल्या 300 कुटुंबीयांना आमंत्रित केलं होतं आणि हे तेच कुटुंबीय होते ज्यांची मुलं #down_syndrome म्हणजेच गतमिंदतेने ग्रस्त होते. अनन्याचे वडील म्हणाले, ‘‘बाप म्हणून आत्ता माझ्या मनाची काय घालमेल होतीय ते मी तुम्हाला सांगू शकतं नाही, माझ्या आयुष्यात मी कुणाचही कधीच वाईट केलं नव्हत तरीही देवाने मला अनन्या सारखी मुलगी दिली जी आयुष्यभर एखाद्या लहांमुलासारखी राहणार आहे याच दुःख मला कायम व्हायचं पण आज मी देवाचे आभार मानतो की अनन्याचा वडील होण्याचं भाग्य त्यांनी मला दिलं, मी जगातला सगळ्यात भाग्यवान बाप आहे कारण फक्त अनन्या मुळेच मला इतरांवर प्रेमकरायचं कळलं.’’

News18

या दोघांचं वैवाहिक आयुष्य कसं असेल? त्यांच्या वेलीवर फुलें बहरतील का? त्यांना एकमेकांची काळजी घेता येईल का? प्रवास कसा करतील, काय खातील असे शेकडो प्रश्न दोघांच्याही आई वडलांना आहेत मात्र सगळ्यांना एकच विश्वास आहे दोघेही कायम एकत्र राहतील. एकमेकांची साथ देतील, हे त्यांच्यासाठी पुरेसं आहे. त्यांच्यासाठी त्यांच्या हक्काचं माणूस या जगात असेल. ही भावनाच खूप काही सांगते. आपण अनन्या आणि विघ्नेश सारखं निखळ प्रेम करूच शकत नाही आपल्या प्रेमात स्वार्थ असतो काहीतरी मिळवीण्याची अपेक्षा असते अनन्या आणि विघ्नेशच्या प्रेमाच्या व्याखेत आपण बसत नाही, कारण आपली प्रेमाची व्यापकता खुजी आहे खूप खुज ….एवढी खुजी की ती पुस्तकी ज्ञान आणि मानवी सल्ल्यांच्या पलीकडे जाऊच शकत नाही. थोडक्यात काय तर, कुणाच्या तरी सांगण्याने, पुस्तके वाचून, काहण्या एकूण चित्रपट पाहून आणि कशाच्याही प्रभावाने व्यक्तीवर निर्माण झालेलं प्रेम हे कधीच प्रेम नसते तर ती असते केवळ एक वासना. मात्र कुणाच्याही प्रभावाखाली न येता तुम्ही कुणावर प्रेम करत असाल तर निश्चिंत रहा तुमची प्रेम खरं आहे कारण तुमची प्रेमगाठ देखील स्वर्गातच बांधली गेलीय.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात