नवी दिल्ली, 22 जून : आतापर्यंत तुम्ही डबल डेकर बस-ट्रेन पाहिली असेल पण कधी डबल डेकर बाईक पाहिली आहे का? अशाच डबल डेकर बाईकचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. एका तरुणाने जुगाड करून ही अनोखी अशी बाईक बनवली आहे. जी पाहून सर्वजण थक्क झाले आहेत. आता डबल डेकर बाईक म्हणजे नेमकं काय, कशी तयार करण्यात आली असा प्रश्न तुम्हाला पडला असेल. जगभरात जुगाडूंची कमतरता नाही. भारतात तर देशी जुगाड करणारे खूप आहेत. अशा देशी जुगाडाचे व्हिडीओही सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. ज्यात अशक्यही शक्य करून दाखवलं जातं. आता या व्हिडीओतच पाहा एका तरुणाने चक्क डबल डेकर बाईक बनवली आहे. आता डबल डेकर बाईक तुम्ही कधी स्वप्नात तरी विचार केला होता का? पण या तरुणानने ती प्रत्यक्षात साकारली आहे. काय सांगता राव! चक्क बिअर पिते ही बाईक; टल्ली होताच असं काही करते की VIDEO पाहून थक्क व्हाल त्याने मूळ बाईकलाच डबलडेकर बनवलं आहे. त्याच्याकडे स्प्लेंडर बाईक आहे. याच बाईकला आणखी दोन चाकं लावून त्याने डबलडेकर बनवली आहे. ही डबलडेकर बाईक तो रस्त्याने चालवताना दिसतो आहे. आता तुम्ही व्हिडीओ नीट पाहिलात तर ही बाईक पावसाळ्यात खूपच उपयोगी येणारी अशी आहे. पावसात तुम्ही पाहिलं असेल रस्त्यावर खूप चिखल असतो. बाईक चालवताना बाईकस्वारांच्या अंगावरही हा चिखल उडतो. पण यावरच या पठ्ठ्याने असा तोडगा काढला आहे. त्याने बाईकच्या चाकांच्या खाली आणखी दोन चाकं लावून आपली बाईक उंच केली. ज्यामुळे तो जमिनीपासून उंच गेला आहे. तो चिखलातून जातो तेव्हा तो चिखलही ्याच्या अंगावर उडत नाही. Viral Video : हा जुगाड पाहून तोंडात बोटं घालाल; दुचाकीची हेडलाईटल वापरून बनवला स्वस्तात मस्त TV @splendor.modifications इन्स्टाग्राम अकाऊंटवर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. त्यावर बऱ्याच कमेंट येत आहेत. बहुतेकांनी या बाईकवर चढायचं-उतरायचं कसं, असा सवाल उपस्थित केला आहे.
तुम्हाला ही डबल डेकर बाईक कशी वाटली ते आम्हाला आमच्या सोशल मीडियाच्या कमेंट बॉक्समध्ये आपली प्रतिक्रिया देऊन नक्की सांगा.