नवी दिल्ली, 16 ऑगस्ट : आपण अनेकदा कुटुंबातील किंवा वडीलधाऱ्या लोकांच्या तोंडून ऐकले असेल की, बाहेरील अन्नापेक्षा घरचे अन्न केव्हाही चांगले असते. बाहेरचे अन्नपदार्थ स्वच्छ नसतात आणि याचा एक पुरावा नुकताच व्हायरल होत असलेल्या काही फोटोंमध्ये पाहायला मिळाला. डॉमिनोजच्या प्रसिद्ध पिझ्झा आउटलेटमध्ये बनवलेल्या पिझ्झासाठी तयार केलेल्या कणकेच्या गोळ्यांवर टॉयलेट ब्रश लटकवल्याचे दिसून आले. बाथरूम क्लिनिंग ब्रश आणि मोप लटकलेला फोटो एका व्यक्तीने ट्विटरवर शेअर (toilet brush hanging over pizza dough) केला आहे.
Photos from a Domino's outlet in Bengaluru wherein cleaning mops were hanging above trays of pizza dough. A toilet brush, mops and clothes could be seen hanging on the wall and under them were placed the dough trays.
Please prefer home made food 🙏 pic.twitter.com/Wl8IYzjULk — Tushar ॐ♫₹ (@Tushar_KN) August 14, 2022
तुषार नावाच्या ट्विटर वापरकर्त्याने अलीकडेच काही फोटो पोस्ट केले आहेत. ज्यात पिझ्झा शॉपमध्ये प्लास्टिकच्या टोपल्यांमध्ये भरपूर कणकेचे गोळे ठेवलेले दिसत आहेत. त्याच्या अगदी वर मॉप आणि टॉयलेट साफ करणारे ब्रश टांगलेले आहेत. तुषारने या पोस्टसोबत लिहिले आहे की, हे बेंगळुरूमधील पिझ्झा आउटलेटचे फोटो आहेत. टॉयलेट क्लिनिंग ब्रश आणि मॉप पिझ्झाच्या कणकेवर अगदी वर टांगलेले आहेत. कृपया घरी शिजवलेले अन्नच खा.
This is how @dominos_india serves us fresh Pizza! Very disgusted.
Location: Bangalore @fssaiindia @MoHFW_INDIA @mla_sudhakar @mansukhmandviya #foodsafety pic.twitter.com/1geVVy8mP5 — Sahil Karnany (@sahilkarnany) July 24, 2022
जुलैमध्ये फोटो शेअर केले होते -
ही पोस्ट पाहून लोकांना आश्चर्य वाटले, कारण डॉमिनोज पिझ्झा ही खूप मोठी कंपनी आहे आणि तिचे भारतात हजारो आउटलेट आहेत. बंगळुरूसारख्या मोठ्या शहरात पिझ्झाच्या दुकानात झालेली अशी चूक लोकांमध्ये संताप व्यक्त करत आहे. हे फोटो सर्वप्रथम तुषारने नव्हे तर साहिल कर्नानी नावाच्या युजरने ट्विटरवर पोस्ट केले होते. हा फोटो त्याने काढलाय, जो बंगळुरूचा आहे. त्याच्या पोस्टपेक्षाही तुषारची पोस्ट आता व्हायरल होत आहे, जी त्याने 14 ऑगस्टला शेअर केली होती.
We adhere to stringent world-class protocols for ensuring the highest standards of hygiene and food safety. We have zero tolerance for violations of these operating standards. The incident brought to our notice will be thoroughly investigated and basis the findings, (1/2)
— dominos_india (@dominos_india) August 14, 2022
डॉमिनोजने दिले उत्तर -
या दोन्ही पोस्टवरून लोक डोमिनोज कंपनीला ट्रोल करत आहेत. एका न्यूज वेबसाइटच्या ट्विटर हँडलवर शेअर केलेल्या पोस्टवर कमेंट करताना कंपनीने म्हटले आहे की, “स्वच्छता आणि अन्न सुरक्षेची सर्वोच्च मानके आम्ही पाळत आहे, सुरक्षेसाठी कठोर जागतिक दर्जाच्या प्रोटोकॉलचे पालन करतो. या मानकांचे उल्लंघन झाल्याने आम्ही दिलगीर आहे.
आमच्या निदर्शनास आणलेल्या घटनेची सखोल चौकशी केली जाईल आणि निष्कर्षांच्या आधारे आवश्यक पावले उचलली जातील. आम्ही खात्री देतो की आमच्या ग्राहकांची सुरक्षा आणि हित सुनिश्चित करण्यासाठी आम्ही सर्वतोपरी प्रयत्न करू.”
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.