मराठी बातम्या /बातम्या /Viral /प्लॅस्टिक सर्जरीच्या नादात तरुणीने कुटुंबाला सोडलं, आता झाली अशी अवस्था....

प्लॅस्टिक सर्जरीच्या नादात तरुणीने कुटुंबाला सोडलं, आता झाली अशी अवस्था....

व्हायरल

व्हायरल

आजच्या जगात लोकांना निरनिराळ्या हौस असल्याचं पहायला, ऐकायला मिळतं. आपल्या इच्छा आकांक्षा पूर्ण करण्यासाठी लोक काहीही करायला तयार असतात.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India

नवी दिल्ली, 5 फेब्रुवारी : आजच्या जगात लोकांना निरनिराळ्या हौस असल्याचं पहायला, ऐकायला मिळतं. आपल्या इच्छा आकांक्षा पूर्ण करण्यासाठी लोक काहीही करायला तयार असतात. नुकतंच एका तरुणीचा व्हिडीओ व्हायरल होत असून तिनं तिच्या इच्छा पूर्ण करण्यासाठी कुटुंबाला सोडलं. हे ऐकून निश्चितच तुम्हालाही आश्चर्य वाटलं असेल मात्र ही गोष्ट खरी असून तिचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चर्चेत आला आहे.

एका यूट्यूब चॅनलने तिची मुलाखत घेतली आहे, जी चर्चेत आहे. 29 वर्षीय डॉली मिक्सचे नाव सध्या तिच्या आकळ्या वेगळ्या आवडीमुळे चर्चेत आलं आहे. ती म्हणते की तिला मानवापेक्षा जास्त प्लास्टिक बनण्यात आहे. डॉलीच्या कुटुंब राजघराण्याशी संबंधित आहे परंतु ती म्हणते की तिला इतरांच्या आदेशांचे पालन करत जगायचं नाहीये. डॉली मिक्स लंडनला आली तेव्हा ती 20 वर्षांची होती. डॉलीने स्वतःला आकर्षक बनवण्याचा निर्णय घेतला आणि घर सोडलं.

हेही वाचा  - लहान मुलाने खेळता खेळता दिली खाण्याची ऑर्डर, बिल आल्यावर वडिलांना बसला धक्का

डॉलीला पहिल्यापासूनच प्लॅस्टिकमध्ये जास्त आवड होती, तर तिनं स्वतःला आकर्षक बनवण्यासाठी प्लॅस्टिक सर्जरीचा पर्याय निवडला. आणि तिच्या घरच्यांना हे मान्य नसल्यामुळे तिनं घर सोडलं. तिचं प्लॅस्टिक वरचं प्रेम पाहून घरच्यांनीही तिला सोडून दिलं. या व्हिडिओमध्ये ती पाच वर्षांनंतर तिच्या चुलत बहिणीला भेटताना दिसत आहे. या व्हिडिओमध्ये ती म्हणते, 'मला माणसापेक्षा प्लास्टिक बनायचे आहे. मी माझ्या कुटुंबाला अनेक वर्षांपासून पाहिले नाही. प्लास्टिक सर्जरी करण्याच्या माझ्या निर्णयाला त्यांचं समर्थन नव्हतं.

" isDesktop="true" id="825702" >

डॉली म्हणते, मी लिप फिलर्स केले आहेत. मी 15 हजार पौंड खर्च केले आहेत. जेव्हा लोक माझा अपमान करतात तेव्हा मला अधिक सशक्त वाटते. आपल्या बालपणीचे वर्णन करताना ती म्हणते, 'लहानपणी मी खूप लाजाळू, शांत होते. मी खूप क्रिएटिव्ह होते. मला फॅशन आणि कलेची आवड होती. माझ्या आईवडिलांनी, विशेषतः माझ्या वडिलांनी मला साथ दिली नाही. मी लग्न करावे आणि बरीच मुले व्हावीत अशी माझ्या कुटुंबाची इच्छा होती.'

दरम्यान, डॉलीचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत असून लोक या व्हिडीओवर खूप साऱ्या प्रतिक्रिया देत आहेत. अनेकजण आपली स्वप्न करण्यासाठी घरापासून दूर राहतात तर काहीजण आपलं घर सोडतात. अशा अनेक घटना समोर येत असतात.

First published:

Tags: Lifestyle, Plastic, Video viral, Viral news, Youtube