नवी दिल्ली, 13 जानेवारी : सोशल मीडियावर प्राण्यांचे अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात. यामध्ये काही व्हिडीओमध्ये प्राणी आपलं कौशल्य दाखवतानाही दिसतात. प्राण्यांचे कौशल्याचं नेटकरी नेहमीच कौतुक करताना पहायला मिळतात. अनेकवेळा लोक प्राण्यांचे व्हिडीओ पाहून आश्चर्यचकित होतात. आजकाल प्राणीदेखील माणसांसारख्या कसरती करताना दिसून येतात. असाच काहीसा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. कुत्र्याचा हा व्हिडीओ पाहून तुम्हीही आश्चर्यचकित झाल्याशिवाय राहणार नाही. तुम्हीही असे अनेक लोक पाहिले असतील ज्यांनी टॅलेंटच्या जोरावर विश्वविक्रम प्रस्थापित करून गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये आपले स्थान निर्माण केले आहे, परंतु क्वचितच एखादा प्राणी विश्वविक्रम करताना पाहिला असेल. जागतिक रेकॉर्डमध्ये असलेल्या प्राण्यांची नावे किंवा व्हिडीओ क्वचितच पहायला मिळतात. सध्या गिनीज बुकमध्ये नाव नोंदवलेल्या कुत्र्याचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर धुमाकुळ घालत आहे. ज्यामध्ये एक कुत्रा त्याच्या मालकासह दोरी उड्या मारत आहे.
व्हायरल होत असलेला हा व्हिडिओ गिनीज वर्ल्ड रेकॉर्डच्या इंस्टाग्राम पेजवर शेअर करून शेअर केला आहे. ज्यामध्ये बालू नावाच्या कुत्र्याने त्याचा मालक वोल्फगँग लॉनबर्गरसोबत 30 सेकंदात सर्वाधिक दोरीवर उडी मारण्याचा विश्वविक्रम केला आहे. याच व्हिडिओमध्ये डॉगी बाळू त्याच्या मालकासोबत स्किपिंग करताना दिसत आहे. डॉगी बाळू हा त्याच्या मालकासह जर्मनीतील स्टेकेनब्रॉकमध्ये राहतो. बाळूने मालकासह 30 सेकंदात 32 वेळा दोरीवर उडी मारून विश्वविक्रम केला आहे.
दरम्यान, जगभरात अनेक प्रकारच्या कुत्र्यांच्या जाती आढळतात. जिथे काही खूप शक्तिशाली असतात, तर काहींमध्ये इतर जातीच्या कुत्र्यांपेक्षा वास घेण्याची आणि समजण्याची शक्ती जास्त असते. सध्या व्हायरल होत असलेल्या कुत्र्याचे दोरी उडी मारण्याचा कौशल्य पाहून नेटकरीही थक्क झाले आहेत. हा व्हिडीओ सध्या चांगलाच पसंतीच उतरत असून व्हिडीओवर खूप साऱ्या प्रतिक्रिया येत आहेत.