जाहिरात
मराठी बातम्या / Viral / Dog Funeral: 17 वर्षांची साथ, मालकानं जड अंत:करणानं दिला निरोप; वाजतगाजत काढली पाळीव कुत्री अंजलीची अंत्ययात्रा

Dog Funeral: 17 वर्षांची साथ, मालकानं जड अंत:करणानं दिला निरोप; वाजतगाजत काढली पाळीव कुत्री अंजलीची अंत्ययात्रा

Dog Funeral: 17 वर्षांची साथ, मालकानं जड अंत:करणानं दिला निरोप; वाजतगाजत काढली पाळीव कुत्री अंजलीची अंत्ययात्रा

माणूस आणि कुत्रा यांच्यातलं प्रेम, जिव्हाळा आपण अनेकदा बघतो. अनेक हिंदी चित्रपटांमध्येही माणूस आणि कुत्रा यांच्यातलं नातं अधोरिखत केल्याचं आपण पाहिलं आहे. पण ओडीशामध्ये अशी प्रत्यक्ष घटना पाहायला मिळाली आहे. ज्याचा व्हिडीओ सध्या सोशळ मीडियावर व्हायरल होत आहे.

  • -MIN READ Trending Desk Viralimalai,Pudukkottai,Tamil Nadu
  • Last Updated :

    मुंबई, 09 ऑगस्ट:  कुत्रा, मांजर यासारखे पाळीव प्राणी आणि माणूस यांच्यातलं जिव्हाळ्याचं नातं सर्वश्रुत आहे. त्यातही कुत्रा आणि माणूस यांच्यातील जिव्हाळा, प्रेम आपण अनेकदा पाहतो. सोशल मीडियावर  या संदर्भातले अनेक व्हिडिओ नेहमीच व्हायरल होत असतात. कुत्रा हा आपल्या मालकाप्रती खूप प्रामाणिक असतो. त्याचा हा गुण दोघांमधलं प्रेम वृद्धिंगत करतो. सध्या एका कुत्र्याशी संबंधित व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. अर्थात, हा व्हिडिओ काहीसा हटके पण दुःखद घटनेवर आधारित आहे. पाळीव कुत्रीच्या मृत्यू झाल्यानंतर एका कुटुंबाने त्याची मोठ्या थाटामाटात आणि वाजतगाजत अंत्ययात्रा काढली. या अंत्ययात्रेसाठी खास बॅंड पथकालाही पाचारण करण्यात आलं होतं. या वेळी संबंधित मालकाने आपल्या कुत्रीचं शव स्वतःच्या हातात घेतल्याचं दिसून आलं. हा व्हिडिओ सध्या चर्चेचा विषय ठरला आहे. टीव्ही नाइन हिंदीने या विषयीचं वृत्त दिलं आहे. माणूस आणि कुत्रा यांच्यातलं प्रेम, जिव्हाळा आपण अनेकदा बघतो. अनेक हिंदी चित्रपटांमध्येही माणूस आणि कुत्रा यांच्यातलं नातं अधोरिखत केल्याचं आपण पाहिलं आहे. ‘तेरी मेहरबानियॉं’ हा हिंदी चित्रपट तर माणूस आणि कुत्रा यांच्यातला जिव्हाळा आणि प्रेमावर आधारित आहे. ओडिशामध्ये अशीच काहीशी घटना सध्या जोरदार चर्चेत आहे. हेही वाचा - शहरातील सुविधांचा वळूनेही घेतला लाभ; लोकल ट्रेनने केला 15 KM प्रवास, विचित्र घटनेचा VIDEO एएनआय या वृत्तसंस्थेनं दिलेल्या वृत्तानुसार, ओडिशामधल्या परलाखेमुंडी येथील एका व्यक्तीनं त्याच्या सर्वात जवळच्या आणि एकनिष्ठ कुत्रीला मोठ्या थाटामाटात अखेरचा निरोप दिला. या कुत्रीच्या मृतदेहाची वाजतगाजत अंत्ययात्रा काढण्यात आली.

    जाहिरात

    या अंत्ययात्रेत मोठ्या प्रमाणावर लोक सहभागी झाल्याचं व्हायरल व्हिडिओमध्ये पाहायला मिळतं. ‘ज्याप्रमाणे कुत्रा हा माणसाप्रती प्रामाणिक, एकनिष्ठ असतो, त्याचप्रमाणे माणसांनीदेखील त्यांच्याप्रती संवेदनशील होणं आवश्यक आहे’, असं यावेळी लोकांनी सांगितलं. परलाखेमुंडी येथील टुन्नू गौडा यांचे त्यांच्या ‘अंजली’ नावाच्या पाळीव कुत्रीवर खूप प्रेम होतं. 17 वर्षानंतर एकत्र सहवासानंतर ‘अंजली’चा मृत्यू झाला. ‘अंजली’ च्या मृत्यूनंतर गौडा कुटुंबाला तीव्र दुःख झालं. त्यानंतर या कुटुंबाने आपल्या लाडक्या कुत्रीला जड अंतःकरणाने अखेरचा निरोप दिला. प्रामाणिक असलेल्या ‘अंजली’ वर गौडा कुटुंबियांचं विशेष प्रेम होतं. त्यांच्याशेजारी राहणारे लोकदेखील ‘अंजली’वर प्रेम करत होते. या कुत्रीला अखेरचा निरोप देण्यासाठी थाटामाटात अंत्ययात्रा काढण्यात आली, तसंच पारंपरिक पद्धतीने अंत्यसंस्कारदेखील करण्यात आले. परलाखेमुंडीच्या रस्त्यांवर टुन्नू गौडा स्वतः हातात अंजलीचं शव घेऊन चालत निघाले. एका माणसाचं पाळीव कुत्र्यावर असणारं हे प्रेम पाहून अनेक लोकांचे डोळे पाणावले होते. एका कुत्र्याची ही अंत्ययात्रा सध्या लोकांमध्ये चर्चेचा विषय ठरली आहे.

    मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
    Tags: funeral , odisha
    • First Published :
    जाहिरात
    जाहिरात