जाहिरात
मराठी बातम्या / Viral / शहरातील सुविधांचा वळूनेही घेतला लाभ; लोकल ट्रेनने केला 15 KM प्रवास, विचित्र घटनेचा VIDEO

शहरातील सुविधांचा वळूनेही घेतला लाभ; लोकल ट्रेनने केला 15 KM प्रवास, विचित्र घटनेचा VIDEO

शहरातील सुविधांचा वळूनेही घेतला लाभ; लोकल ट्रेनने केला 15 KM प्रवास, विचित्र घटनेचा VIDEO

आता ट्रेनचा फक्त माणसंचं नाही तर प्राणीही फायदा घेत असल्याचं चित्र नुकतंच पाहायला मिळालं. झारखंडमधल्या लोकल ट्रेनमधील एक व्हिडिओ सध्या समोर आला आहे. जो पाहून तुम्हालाही आश्चर्याचा धक्का बसेल. (Bull travels 15 km in a local train)

  • -MIN READ Jharkhand
  • Last Updated :

रांची 08 ऑगस्ट : आजकाल प्रवासासाठी शहरांमध्ये अनेक सुविधा उपलब्ध झाल्या आहेत. ज्यामुळे नागरिकांचा प्रवासाचा खर्च कमी होण्यासोबतच वेळेचीही बचत होते. यातीलच एक उत्तम प्रवासाचं साधन म्हणजे लोकल ट्रेन. मात्र, आता या ट्रेनचा फक्त माणसंचं नाही तर प्राणीही फायदा घेत असल्याचं चित्र नुकतंच पाहायला मिळालं. झारखंडमधल्या लोकल ट्रेनमधील एक व्हिडिओ सध्या समोर आला आहे. जो पाहून तुम्हालाही आश्चर्याचा धक्का बसेल. चमत्कार की नशीब! धावत रोड क्रॉस करताना भरधाव ट्रकखाली आली महिला; पण साधं खरचटलंही नाही झारखंडच्या साहिबगंजमधून बिहारमध्ये जाणाऱ्या एका रेल्वेत एक वळू प्रवास करत असल्याचं पाहायला मिळालं. हे दृश्य पाहून रेल्वेतील प्रवाशांना आश्चर्याचा धक्का बसला. ट्रेनमधील एका प्रवाशाने दिलेल्या माहितीनुसार, टवाळखोरांच्या एका टोळीने मिर्झा चौकी स्टेशनवर वळूला ट्रेनमध्ये आणलं आणि त्याला आतमधील खांबाला बांधलं. यानंतर या वळूने तब्बल 15 किलोमीटर ट्रेनने प्रवास केला.

जाहिरात

ज्या टोळक्याने वळूला सीटला बांधलं होतं, त्यांनी जाताना तिथं असलेल्या इतर प्रवाशांना या बैलाला पुढच्या स्टेशनवर उतरून देण्यासही सांगितलं. परंतु घाबरलेल्या काही प्रवाशांनी दुसऱ्या बोगीत जायला सुरुवात केली. या ठिकाणी उपस्थित असलेल्या काही प्रवाशांनी या घटनेचा व्हिडिओ काढला. VIDEO - खाताच बेडकांना बसला ‘440 व्होल्टचा झटका’; कोण आहे हा किडा तुम्ही सांगू शकता का? अखेर ट्रेनमधील काही प्रवाशांची मदत घेत एका व्यक्तीने साहिबगंज येथील स्टेशनवर वळूची सुटका करून त्याला ट्रेनमधून खाली उतरवलं. परंतु, हा वळू चवताळला असता अथवा तो सुटला असता तर ट्रेनमध्ये मोठा अनर्थ होण्याची शक्यता होती. त्यामुळे हे प्रकरण गांभीर्याने घेत प्रकरणाच्या चौकशीचे आदेश देण्यात आलेले आहेत.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात