जाहिरात
मराठी बातम्या / Viral / Viral Video : भर पावसात कुत्र्याचा हटके डान्स, उड्या मारत थेंबाशी खेळतोय

Viral Video : भर पावसात कुत्र्याचा हटके डान्स, उड्या मारत थेंबाशी खेळतोय

पावसात कुत्र्याचा डान्स

पावसात कुत्र्याचा डान्स

यंदा उन्हाळ्याने सर्वांनाच हैराण करुन सोडलं. उष्णतेच्या लाटेपासून वाचण्यासाठी लोकांनी अनेक जुगाडही केलेले पहायला मिळाले. हळूहळू कडाक्याच्या गरमीत थंडगार पावासाची चाहूल सुरु झालीये.

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

नवी दिल्ली, 18 जून : यंदा उन्हाळ्याने सर्वांनाच हैराण करुन सोडलं. उष्णतेच्या लाटेपासून वाचण्यासाठी लोकांनी अनेक जुगाडही केलेले पहायला मिळाले. हळूहळू कडाक्याच्या गरमीत थंडगार पावासाची चाहूल सुरु झालीये. त्यामुळे माणसांपासून प्राण्यांपर्यंत सर्वच या पावसामुळे सुखावत आहेत. उकाड्याने कंटाळलेले लोक आता पावसाच्या येण्यामुळे आनंदाने उड्या मारत आहेत. यामध्ये प्राणीही आपला आनंद दाखण्यामध्ये कमी नाहीत. नुकताच एका कुत्र्याचा व्हिडीओ समोर आलाय ज्यामध्ये तो पावसाच्या येण्यामुळे आनंदाने उड्या मारत आहे. एक कुत्रा भर पावसात आनंदात उड्या मारत पावसाचा आनंद लुटत आहे. उष्णतेपासून दिलासा मिळण्यासोबतच या कुत्र्याला चांगलीच मजा येत असल्याचे दिसून येत आहे. हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर सर्वांचं लक्ष वेधत आहे.

News18लोकमत
News18लोकमत

सोशल मीडियावर व्हायरल होत असलेला हा व्हिडिओ गुवाहाटी येथील असल्याचे सांगण्यात येत आहे. कडाक्याच्या उन्हानंतर तेथील नागरिकांना पावसाने मोठा दिलासा दिला. या व्हिडिओमध्ये पावसामुळे कुत्र्याचा आनंद दिसत आहे. उष्णतेची लाट आल्यानंतर पावसामुळे माणसांच्या आनंदाची कल्पना करता येते, पण या व्हिडिओमध्ये हा कुत्रा ज्या पद्धतीने पाण्याच्या थेंबाशी खेळत आहे, ते पाहून तुमचे मनही आनंदी होईल. तुमच्याही चेहऱ्यावर हास्य उमटेल.

जाहिरात

या व्हिडिओमध्ये एक कुत्रा पावसाच्या थेंबांसोबत उडी मारून मजा करत असल्याचे दिसत आहे. मुसळधार पावसामुळे उष्णतेची लाट सरुन थंडगार ओलावा झाल्याचं दिसत आहे. त्यामुळे कुत्राही आनंदी आहेच आणि त्याला पावसाच्या पाण्यात खेळण्याची मजाही येतेय. हा व्हिडीओ सोशल मीडियावर अनेकांची मने जिंकत आहे. @rupin1992 नावाच्या ट्विटर अकाऊंटवर हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. 30 सेकंदांचा हा व्हिडीओ सध्या अनेकांची मन जिंकत असून व्हिडीओवर भरभरुन कमेंट आणि लाईक्सचा वर्षाव होत आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात