• Home
 • »
 • News
 • »
 • viral
 • »
 • पार्टीबहाद्दर डॉगी! प्रत्येक पार्टीत झोडतो स्वतःचं फेव्हरेट Drink

पार्टीबहाद्दर डॉगी! प्रत्येक पार्टीत झोडतो स्वतःचं फेव्हरेट Drink

एक पाळीव कुत्रा पार्ट्यांसाठी इतका तयार झाला आहे (Dog consumes his favorite drink in the party) की तो प्रत्येक पार्टीत सराईतपणे आपलं आवडतं ड्रिंक पित बसतो.

 • Share this:
  नवी दिल्ली, 13 ऑक्टोबर : एक पाळीव कुत्रा पार्ट्यांसाठी इतका तयार झाला आहे (Dog consumes his favorite drink in the party) की तो प्रत्येक पार्टीत सराईतपणे आपलं आवडतं ड्रिंक पित बसतो. प्राणी पाळणाऱ्या प्रत्येकाला असं वाटतं की (Relation between pet and it’s owner) या प्राण्याने सदैव आपल्यासोबत राहावं. प्राण्यांना आपल्यापासून वेगळं ठेवण्याची वेळ येऊ नये. त्यासाठी शक्य त्या सर्व ठिकाणी प्राण्यांचे मालक त्यांना घेऊन जात असतात. सतत मालकांसोबत राहून राहून प्राण्यांनादेखील त्यांच्या सवयी आणि शिष्टाचार अंगवळणी पडायला सुरुवात होते. कुत्रा झालाय पार्टी बहाद्दर सतत कुठल्या ना कुठल्या पार्टीला जाणाऱ्या एका महिलेनं आपल्या कुत्र्यालाही पार्टीसाठी तयार केलं आहे. महिलेनं पाळलेला हा गोल्डन रिट्रीव्हर जातीचा कुत्राही काहीसा असाच आहे. प्रत्येक पार्टीत जाताना तो मालकिणीसोबत असतो. त्यामुळेच असेल कदाचित, त्याला पार्टीत ड्रिंक झोडण्याची चांगलीच सवय लागली आहे. कुत्रा पितो ड्रिंक या कुत्र्याचं प्रत्येक पार्टीतील आवडतं ड्रिंक म्हणजे पाणी. पण कुत्रा असूनही तो ग्लासमधून पाणी पितो. त्याच्या या कलेला प्रत्येक पार्टीत दाद मिळते आणि कुत्रा ग्लासनं पाणी पित असल्याचं पाहून प्रत्येकाची हसून हसून मुरकुंडी वळते. केवळ एवढंच नाही, तर या कुत्र्याचा पेहरावदेखील सर्वांना आकर्षित करतो. प्रत्येक पार्टीत जाताना तो टाय आणि डॅपर आऊटफिट घालूनच हजर राहतो. त्यामुळे पार्टीतील इतर कुणाहीपेक्षा हा कुत्राच सर्वांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू असतो. हे वाचा - या मंदिरात स्वत: कलेक्टर देवीला दाखवतात मदिरेचा नैवेद्य,तीर्थ म्हणूनही होतं वाटप लाखो जणांनी केले लाईक कुत्र्याची मालकीण एक टिकटॉक स्टारदेखील आहे. तिने टाकलेला हा व्हिडिओ आतापर्यंत अनेकांनी लाईक केला आहे. आतापर्यत कुत्र्याच्या पार्टीतील व्हिडिओला लाखो लाईक्स मिळाले आहेत. या कुत्र्याच्या अंगात असणारे कलागुण हे गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद होण्याच्या क्षमतेचे आहेत, अशी कमेंटही एका चाहत्यानं केली आहे.
  Published by:desk news
  First published: