जाहिरात
मराठी बातम्या / Viral / Shocking! 10 वर्षाच्या मुलाच्या जबड्यात होते 50 दात; काढण्यासाठी अडीच तास डॉक्टरांनी केले प्रयत्न अन्...

Shocking! 10 वर्षाच्या मुलाच्या जबड्यात होते 50 दात; काढण्यासाठी अडीच तास डॉक्टरांनी केले प्रयत्न अन्...

Shocking! 10 वर्षाच्या मुलाच्या जबड्यात होते 50 दात; काढण्यासाठी अडीच तास डॉक्टरांनी केले प्रयत्न अन्...

मेडिकल जगतात या आजाराला Odontoma असं म्हणतात. एक लाखात या आजाराची केवळ 1 ते 2 प्रकरणं आढळतात

  • -MIN READ
  • Last Updated :

भोपाळ 01 मार्च : मानवी शरीर हे अतिशय अजब आहे असं म्हटलं जातं. अनेकदा शरीरात असे काही अवयव आढळतात, ज्याबद्दल कोणालाच माहिती नसतं. याबद्दलची निरनिराळी प्रकरणंही आपल्याला ऐकायला किंवा वाचायला मिळतात. सध्या असंच एक प्रकरण मध्य प्रदेशच्या इंदूरमधून समोर आलं आहे. इथे एका मुलाच्या जबड्यात चक्क 50 दात होते (10 Year Old Boy with 50 Teeth). या मुलाच्या दातांमध्ये वेदना होत असल्याने डॉक्टरांनी तपासणी केली असता समजलं की तो एका दुर्मिळ आजाराने ग्रस्त आहे. 5 दिवसात 2 वेळा गरोदर राहिली महिला; डिलिव्हरीवेळी मात्र भलतंच घडलं, अजब प्रकरण मेडिकल जगतात या आजाराला Odontoma असं म्हणतात. एक लाखात या आजाराची केवळ 1 ते 2 प्रकरणं आढळतात. या केसमध्ये 10 वर्षाच्या मुलाचा जबडा भरपूर सुजलेला होता. बऱ्याच काळापासून त्याचे दात दुखत होते. अशात त्याचं लगेचच ऑपरेशन करणं गरजेचं होतं. डॉक्टर सचिन ठाकूर यांच्या म्हणण्यानुसार, वेळेत या आजारावर उपचार न केल्यास याचे गंभीर परिणाम होऊ शकतात. या मुलाच्या बाबतीतही असंच होतं. त्याचे हे अधिकचे दात त्याच्या चांगल्या दातांवरही परिणाम करू लागले होते. अशात तात्काळ त्याचं ऑपरेशन करण्याचा निर्णय घेतला गेला. यानंतर तीन डॉक्टरांच्या टीमने या मुलाच्या दातांचं यशस्वीरित्या ऑपरेशन केलं.

VIDEO - फक्त एक पाय राहिल इतकीच जागा; चिमुकलीसाठी CISF जवानाने लावली जीवाची बाजी

ऑपरेशनदरम्यान या मुलाचे 50 पैकी 30 दात काढले गेले (Doctors Removed 30 Teeth of a Boy). असंही सांगितलं जात आहे, की 18 वर्षाचा होईपर्यंत मुलाचे 30 दात परत येतील. हे ऑपरेशन अतिशय कठीण होतं, असं सांगितलं जात आहे. त्यामुळे हे ऑपरेशन करण्यास पूर्ण अडीच तास लागले. आता मुलाची प्रकृती स्थिर असल्याचं सांगितलं जात आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात