श्रीनगर, 22 मार्च : भूकंपाच्या धक्क्याने सर्वजण हादरले आहेत. भूकंपाचे बरेच व्हिडीओ सोशल मी़डियावर व्हायरल होत आहेत. अशाच एका व्हिडीओने सर्वांचं लक्ष वेधूल आहे. ज्यावेळी धरती हादरत होती, त्याचवेळी एक बाळाचाही आईच्या गर्भातून बाहेर येण्याची धडपड सुरू होती. भूकंपातील डिलीव्हरीची हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतो आहे.
जम्मू-काश्मीरच्या अनंतनाग जिल्ह्यातील ही घटना आहे. उत्तर भारतात भूकंपाचे झटके बसले त्यावेळी इथल्या एका हॉस्पिलटमध्ये प्रेग्नंट महिलेची डिलीव्हरी होत होती. महिलेचं सिझेरियन केलं जात होतं. त्याच वेळी अचानक भूकंप आला. संपूर्ण हॉस्पिटल हलू लागलंं. ऑपरेशन थिएटरमधील मशीन्स, इतर सामान हलत होती. पायाखालची धरतीही हलत होती. पण प्रसूती करत असलेले डॉक्टर काही तिथून हलले नाही. भूकंपाचे झटके बसले तरी डॉक्टर्स डिलीव्हरी करत राहिले.
Alert! भारतातील या शहरांना भूकंपाचा सर्वाधिक धोका; तुमचं शहरही या यादीत आहे का पाहा
व्हिडीओत तुम्ही पाहू शकता पुरुष आणि महिला डॉक्टर दिसत आहे. इतर काही कर्मचारीही तिथं आहेत. बेडवर प्रेग्नंट महिला आहे, जिचं सिझेरियन ऑपरेशन होतं आहे. सुरुवातीला सर्वकाही सुरळीत दिसतं. अचानक लाइट जाते आणि पुन्हा येते. त्यानंतर सर्वकाही हलताना दिसते. पुन्हा थोड्यावेळाने वीज जाते. असं बराच वेळ सुरू असतं.
आता अशा परिस्थितीत कुणीही आपला जीव वाचवण्यासाठी धडपड करेलं. हातातलं काम सोडून तिथून पळ काढेल. ऑपरेशन थिएटरमधीलही सर्वजण घाबरतात. पण तरी तिथून कुणीच हलत नाही. लाइट जाते तेव्हा मशीनच्या प्रकाशावर ऑपरेशन सुरू राहतं. त्यांना संकटाचा अंदाज आला पण तरी आपल्या जीवाची बाजी लावून ते ऑपरेशन करताना दिसतात. एक डॉक्टर देवाचीही प्रार्थना करताना दिसतो. सर्वजण त्या महिलेला आणि एकमेकांना धीर देतात. काही घाबरण्याची गरज नाही, सर्व ठिक आहे असं म्हणतात.
नागपूर - आईच्या पोटातच अडकलं बाळ; शरीराबाहेर येईपर्यंत गेली 15 वर्षे, झाली अशी अवस्था
माहितीनुसार महिलेने एका बाळाला जन्म दिला आहे. सुदैवाने महिला, बाळ आणि ऑपरेशन थिएटरमधील डॉक्टर, नर्स, इतर कर्मचारी सर्वजण सुखरूप आहेत.
Emergency LSCS was going-on at SDH Bijbehara Anantnag during which strong tremors of Earthquake were felt. Kudos to staff of SDH Bijbehara who conducted the LSCS smoothly & Thank God,everything is Alright.@HealthMedicalE1 @iasbhupinder @DCAnantnag @basharatias_dr @DHSKashmir pic.twitter.com/Pdtt8IHRnh
— CMO Anantnag Official (@cmo_anantnag) March 21, 2023
अनंतनाग जिल्ह्याच्या मुख्य वैद्यकीय अधिकाऱ्यांनी ट्विटर अकाऊंटवर हा व्हिडीओ पोस्ट केला आहे. व्हिडीओ पाहिल्यानंतर त्यावर बऱ्याच कमेंट येत आहेत. या डॉक्टरांचं सर्वांनी कौतुक केलं आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Earthquake, Jammu and kashmir, Pregnant, Pregnant woman, Social media, Top trending, Viral, Viral videos