जाहिरात
मराठी बातम्या / Viral / दिवसाला 15 ते 20 लिटर दूध, 20 अंडी, एक किलो देशी तूप खातो हा 'राजा', असं काय आहे या रेड्यात, पाहा VIDEO

दिवसाला 15 ते 20 लिटर दूध, 20 अंडी, एक किलो देशी तूप खातो हा 'राजा', असं काय आहे या रेड्यात, पाहा VIDEO

भीम रेडा

भीम रेडा

उन्हाळ्यात त्याच्या आंघोळीसाठी तळे बनवलेले असते, त्यात दिवसभर पाणी असते. त्याला पहाटे पाच वाजता उठवण्यात येते.

  • -MIN READ Local18 Jodhpur,Rajasthan
  • Last Updated :

पुनीत माथुर, प्रतिनिधी जोधपूर, 2 जुलै : राजस्थानच्या उदयपूर येथील कृषी मंडई परिसरात विभागीय स्तरावरील किसान महोत्सव आयोजित करण्यात आला. या किसान महोत्सवात ‘राजा’ नावाचा मुर्रा जातीचा रेडा ‘विकी डोनर’ म्हणून फारच चर्चेत राहिली. याचे कारण म्हणजे राजस्थान आणि हरियाणामध्ये त्याचे 11 हजार मुले होणे, हे होते. तुम्ही कल्पनाही करू शकत नाही, पण हा एक असा रेडा आहे, जो तब्बल 3 लाख प्राण्यांचा जैविक पिता आहे. तुम्हाला कदाचित विश्वास बसणार नाही. पण हे 100 टक्के खरे आहे. जोधपूरमधील मुर्रा जातीच्या ‘भीमा’ या रेड्याचे वजन 1500 किलो आहे. तो सुमारे साडे चौदा फूट लांब आणि सहा फूट उंच आहे. जगातील हा एकमेव मुर्रा प्रजातीचा रेडा आहे. त्याच्या वीर्यापासून आतापर्यंत तीन लाख म्हशींची मुले जन्माला आली आहेत. संपूर्ण भारतासह नेपाळ आणि बांगलादेशात त्याच्या वीर्याला मागणी आहे. यातून जन्मलेल्या अडीच ते तीन वर्षांच्या मादी म्हशीने दररोज 19 ते 20 लिटर दूध दिले आहे. हे दूध पशुपालकांच्या उत्पन्नाचे मोठे साधन आहे.

News18लोकमत
News18लोकमत

मुर्रा जातीची हा रेडा संपूर्ण जगात एकमेव आहे. त्याच्या वीर्याला देश-विदेशात मागणी आहे. हे पूर्णपणे देशी असलेले पशुधन आहे. यामध्ये मिश्र जाती नाही. त्याचे वीर्य डॉक्टरांच्या देखरेखीखाली काढले जाते आणि - 200 अंश तापमानात संरक्षित केले जाते. यापासून जन्म घेणाऱ्या एका म्हशीने दररोज सुमारे 27 लिटर दुधाचे उत्पादन केले. याच्या एका वर्षापर्यंतच्या म्हशीची किंमत एक ते दीड लाख रुपयांपर्यंत असते.

मुर्रा जातीचा रेडा ‘भीमा’ने भारतात सुमारे 20 प्रकारच्या चॅम्पियनशिप जिंकून जगातील नंबर वन रेड्याचा किताब पटकावला आहे. त्याच्यावर 30 कोटी रुपयांची बोली लागली होती. मात्र, तो विक्रीसाठी उपलब्ध नाही आहे. त्याचा मासिक देखभाल खर्च सुमारे 1.25 लाख रुपये येतो. डॉक्टर आणि आहारतज्ज्ञांच्या देखरेखीखाली त्याला अन्न दिले जाते. त्याला आधी एसी हॉलमध्ये ठेवण्यात आले होते. परंतु नंतर डॉक्टरांच्या सल्ल्याने ते ओपन एअर कूलिंग सिस्टममध्ये ठेवण्यात आले होते. मोकळ्या जागेत ‘भीम’साठी दोन मोठे कुलर लावण्यात आले आहेत. उन्हाळ्यात त्याच्या आंघोळीसाठी तळे बनवलेले असते, त्यात दिवसभर पाणी असते. त्याला पहाटे पाच वाजता उठवण्यात येते. यानंतर दोन तास मातीत लोळवले जाते. यानंतर खायला दिले जाते. नंतर आंघोळीनंतर चार जण त्याला मोहरीच्या तेलाने त्याची मालिश करतात. दिवसभर विश्रांती घेतल्यानंतर संध्याकाळी ‘भीम’ला खाऊ घातल्यानंतर पुन्हा चालायला लावले जाते. जगज्जेत्याप्रमाणे त्याची काळजी घेतली जाते. प्रत्येक दिवसाला त्याला 15 ते 20 लिटर दूध, हिवाळ्यात सुमारे 20 अंडी, सुका मेवा, एक किलो देशी तूप आणि अर्धा किलो बटर दिवसाला दिले जाते. मुर्रा जातीच्या ‘भीमा’चे मालक अरविंद जांगीड सांगतात की, शेतकरी आणि पशुपालक या म्हशीच्या रेड्याच्या वीर्याचा फायदा घेऊ शकतात. त्याच्या वीर्यापासून जन्माला येणाऱ्या म्हशीच्या दुधाची क्षमता वाढते. त्यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक फायदा होतो. साधारणपणे, त्याच्या वीर्याची बाजारातील किंमत 1,500 ते 2,500 रुपयांपर्यंत असते, परंतु अरविंद त्याच्या किमतीपेक्षा 500 रुपयांनी कमी देतात. कोणत्याही शेतकऱ्याला मुर्रा जातीच्या ‘भीम’ म्हशीचे वीर्य घ्यायचे असल्यास त्यांनी अरविंद जांगीड यांच्याशी त्यांच्या मोबाईल क्रमांक 89468-70270, 98291-65995 वर संपर्क साधू शकतात.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात