मराठी बातम्या /बातम्या /Viral /

अरे देवा! दिवाळीत फटाक्यांवर बंदी आली म्हणून भाऊंनी केला अजब जुगाड, पाहा VIDEO

अरे देवा! दिवाळीत फटाक्यांवर बंदी आली म्हणून भाऊंनी केला अजब जुगाड, पाहा VIDEO

फटाक्यांचा मोह आवरला पण त्यावरून काय काय जुगाड शोधून काढतील याचा नेम नाही.

फटाक्यांचा मोह आवरला पण त्यावरून काय काय जुगाड शोधून काढतील याचा नेम नाही.

फटाक्यांचा मोह आवरला पण त्यावरून काय काय जुगाड शोधून काढतील याचा नेम नाही.

    मुंबई, 14 नोव्हेंबर : देशात प्रदूषण कमी व्हावं आणि फटाक्यांमुळे होणाऱ्या प्रदूषणातून कोरोनाचा धोका सर्वात जास्त वाढू नये यासाठी अनेक राज्यांनी जवळपास 13 हून जास्त राज्यांनी फटाक्यांवर बंदी आणली आहे. 30 नोव्हेंबरपर्यंत ही बंदी असणार आहे. पण तरीही अशावेळी जे लोक फटाके वाजवतील त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात येत आहे. अशा परिस्थितीत फटाके वाजवण्याचा फिल तरी किमान यायला हवा म्हणून एका पठ्ठ्यानं अजब जुगाड केला आहे. त्याचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये आपण पाहू शकता की तरुणानं एक छोटा लाकडी गोल आकाराची वस्तू घेतली आहे. त्यामधून सुरसुर आवाज येत आहे. फटाके उडवताना येणारा आवाज काढण्यासाठी तो शिट्टी वाजवतो आणि फटाका फुटला हे दाखवण्यासाठी तो शेजारी असलेल्या पत्र्यावर हात अपडतो. असा हा अजब व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हे वाचा-धक्कादायक! ऐन दिवाळी दिवशी जिल्हाध्यक्षाचा आत्मदहनाचा प्रयत्न, पंढरपुरात खळबळ फटाक्यांचा मोह आवरला पण त्यावरून काय काय जुगाड शोधून काढतील याचा नेम नाही. काही दिवसांपूर्वी फुग्यांना आग लावून ते फोडल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला होता. त्यानंतर आता हा व्हिडीओ समोर आला आहे. आतापर्यंत हा व्हिडीओ 32 हजारहून अधिक लोकांनी पाहिला आहे. 9 नोव्हेंबर रोजी हा व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट करण्यात आला होता. अनेक युझर्सनी या व्हिडीओला लाईक केलं आहे. फटाक्यांवर किती दिवस बंदी राहणार असाही प्रश्न अनेक युझर्सनी विचारला आहे. फटाक्यांमुळे होणाऱ्या प्रदूषणामुळे कोरोनाचा धोका वाढू शकतो अशी चिंता व्यक्त केली आहे.
    Published by:Kranti Kanetkar
    First published:

    Tags: Diwali-celebrations, Eco friendly Diwali, Viral news

    पुढील बातम्या