नवी दिल्ली, 29 जून : जगभरात अनेक चहाप्रेमी आहेत. जे कुठेही कधीही चहा पिऊ शकतात. मग त्यांचा कोणताही काळ, वेळ, ठिकाण, याच्याशी काही एक संबंध नसतो. फक्त त्यांना चहा हवा असतो. मात्र अनेक ठिकाणी चहा बनवण्याची प्रक्रिया विचित्र असते. ज्याला पाहून तुम्हाला परत त्या ठिकाणचा चहा पिण्याची इच्छाही होणार नाही. नुकताच एक व्हिडीओ समोर आलाय जो पाहून तुम्हीही परत इकडे चहा पिण्यासाठी दहा वेळा विचार कराल. सोशल मीडियावर नुकताच एक व्हिडीओ समोर आलाय ज्यामध्ये रेल्वे स्टेशनवरील चहा विक्रीची एक झलक पहायला मिळतेय. त्यामुळे तुम्हीही रेल्वे स्टेशवरील चहा पित असाल तर हा व्हिडीओ नक्ती बघा.
ट्रेन येण्यापूर्वी किटलीमध्ये चहा भरल्याचे व्हायरल व्हिडीओमध्ये दिसत आहे. किटलीमध्ये चहा ज्या पद्धतीने भरला जात आहे ते घृणास्पद आहे. याठिकाणी ना स्वच्छतेची काळजी घेतली गेली ना कोणत्याही प्रकारचा मास्क घातला गेला. अतिशय अस्वच्छ पद्धतीने बादलीनं किटलीमध्ये चहा ओतताना दिसतोय.
@viral._bhaiya नावाच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. एवढंच नाही तर नेटकरी व्हिडीओ पाहून संतापही व्यक्त करत आहे. अनेक कमेंट या व्हिडीओवर येताना दिसत आहे. दररोज लाखो प्रवासी रेल्वेने प्रवास करतात. ट्रेनमध्ये मिळणारा चहा अनेकांना आवडतो. काही प्रवासी तर प्रवासादरम्यान अनेकवेळा चहाचा घोट घेतात. प्रवास लांबचा असेल तर लोक हमखास चहा घेतात. मात्र तो किती स्वच्छता राखून बनवला आहे हा एक मोठा प्रश्न आहे. त्यामुळे हे तुमच्या आरोग्यासाठी हानिकारकही ठरू शकतो.