तुर्की, 9 फेब्रुवारी : कोरोना काळ हा सर्वांसाठी परीक्षेचा काळ होता. यादरम्यान नागरिक अनेक महिने घरी होते. कोरोना टाळण्यासाठी मित्र-मैत्रिणींपासून नातेवाईकांसोबत उठणं-बसणं कमी झालं होतं. आपलीच माणसं समोर असली तरी त्यांच्यापासून दुरावा ठेवावा लागत होता. लोक यापासून बचाव करण्यासाठी पूरेपूर प्रयत्न करीत होते. अशातच एक विक्षिप्त प्रकार समोर आला आहे. एका कर्मचाऱ्याने आपल्या बॉसला मारण्यासाठी कोरोना रुग्णाकडून लाळ खरेदी केल्याचा किळसवाणा प्रकार समोर आला आहे. दक्षिण-पूर्व तुर्कीमधील अदाना येथे राहणाऱ्या इब्राहिम उर्वंडी यांनी यासंदर्भात गुन्हा दाखल केला आहे. त्यांनी केलेल्या तक्रारीनुसार तीन वर्षे त्यांच्यासाठी काम करणाऱ्या कर्मचाऱ्याने जीवे मारण्याचा प्रयत्न केला. त्याचं झालं असं, उर्वंडी यांनी गाडीची विक्री केली होती. त्यानंतर त्यांनी कर्मचाऱ्याकडे 215000 तुर्की लीरा म्हणजेच 22 लाख रुपये दिले व हे पैसे ऑफिसमध्ये नेण्यास सांगितले. त्याच्याजवळ माझी चावी असल्याचं उर्वंडी यांनी सांगितलं. त्यानंतर बऱ्याचदा फोन करुन त्याने उत्तर दिलं नाही. शेवटी दुसऱ्या दिवशी पैसे चोरी केल्याचे सांगितले. माझ्या डोक्यावर कर्ज असल्याने हे पैसे चोरत असल्याचं त्याने आपल्या बॉसला सांगितलं. द स नने यासंदर्भातील वृत्त प्रसिद्ध केलं आहे. हे ही वाचा- धक्कादायक! कोरोना लस घेतली आणि तडफडत जमिनीवर कोसळला; 25 मिनिटांतच गेला जीव उर्वंडी यांनी दावा केला आहे की, या कर्मचाऱ्याने पैसे चोरून नेण्यापूर्वी मला मारण्याचा प्रयत्न केला होता. त्याने कोविड रुग्णाचं लाळ असलेलं पेय दिलं होतं. मात्र मी ते प्यायलं नाही. या कर्मचाऱ्याने 5000 रुपयांत कोविड रुग्णाकडून लाळ विकत घेतली होती. आणि ही लाळ त्याने माझ्या पेयात मिसळली. याबाबत ऑफिसमधील एका कर्मचाऱ्याने याची माहिती दिली. इतकच नाही तर कर्मचाऱ्याने बॉसला धमकीचे मेसेजही पाठवले आहेत. यावरुन तो बॉसला जीवे मारण्याचा प्रयत्न करीत असल्याचं स्पष्ट होतं. त्या एका मेसेजमध्ये लिहिलं आहे की, मी तुम्हाला कोरोनाने मारू शकलो नाही, मात्र पुढच्या वेळी गोळ्या घालीन.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.