मराठी बातम्या /बातम्या /करिअर /तुम्हीही वारंवार जॉब बदलता का? यामुळे तुमच्या प्रोफाईलचं होऊ शकतं 'हे' मोठं नुकसान

तुम्हीही वारंवार जॉब बदलता का? यामुळे तुमच्या प्रोफाईलचं होऊ शकतं 'हे' मोठं नुकसान

 यामुळे काय नुकसान होऊ शकतं आणि काय फायदा होऊ शकतो हे आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

यामुळे काय नुकसान होऊ शकतं आणि काय फायदा होऊ शकतो हे आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

यामुळे काय नुकसान होऊ शकतं आणि काय फायदा होऊ शकतो हे आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

मुंबई, 16 ऑगस्ट: आजकालच्या काळात कोणाचाच जॉब हा शाश्वत नाही असं आपण नेहमीच ऐकत असतो. कोरोनामुळे तर अनेकांना याचा अनुभवही आला. एका क्षणात जॉब (Job) जाणं काय असतं हे अनेकांनी या काळात अनुभवलं. मात्र याउलट आजकालच्या तरुणाईमध्ये वारंवार जॉब (Frequent Job change) बदलत राहण्याची क्रेझ आहे. एका कंपनीतून दुसऱ्या कंपनीमध्ये जॉब बदलत राहिल्यामुळे पगार वाढवून (Salary Hike) मिळतो म्हणून अनेकजण जॉब बदलतात. मात्र या सर्व गोष्टींचा तुमच्या प्रोफाईलवर (Frequent job change may affect you career) परिणाम होऊ शकतो हे तुम्हाला माहिती आहे का?  यामुळे काय नुकसान होऊ शकतं आणि काय फायदा होऊ शकतो हे आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

हे आहेत वारंवार जॉब बदलण्याचे फायदे

आपला वेगवेगळ्या कंपन्यांमध्ये काम करण्याचा अनुभव वाढतो.

आपण मनाप्रमाणे काम करू शकतो.

मोठ्या कंपन्यांमध्ये काम करण्याचं स्वप्न पूर्ण होतं.

नवनवीन लोकांशी आणि वरिष्ठांशी ओळख होते.

कंपनी बदलत राहिल्यास पगार आणि पॅकेजमध्ये वाढ होते.

हे वाचा - महत्त्वाची बातमी! ऑफिसमध्ये 'या' गोष्टी चुकूनही बोलू नका; अन्यथा धोक्यात येऊ शकतं तुमचं करिअर

हे आहे वारंवार जॉब बदलत राहण्याचं नुकसान

जेव्हा तुम्ही दुसऱ्या कंपनीत दुसऱ्या नोकरीसाठी जाता तेव्हा मुलाखतीच्या वेळी तुमचा रेझ्युमे बघतांना समोरच्याच्या मनात तुमची नकारात्मक प्रतिमा तयार होते, त्याला विचार करायला भाग पाडलं जातं की तुम्ही इतक्या नोकऱ्या का बदलल्या? याचं तुमच्याकडे काही उत्तर नसतं.

तुमची क्षमता पाहता तुम्हाला वेगळी नोकरी मिळते पण त्या कंपनीमधील बॉस तुमच्यावर विश्वास ठेवत नाहीत. तुम्ही इतक्या नोकऱ्या बदलल्या आहेत त्यामुळे तुम्ही हे पण कंपनी सोडून दुसरीकडे जाणार हा समज त्यांच्या मनात असतो. त्यामुळे कंपनीचं महत्त्वाचं काम तुम्हाला मिळू शकत नाही.

तुम्हाला आयुष्यात कोणत्या दिशेने पुढे जायचं आहे हे माहित नाही. म्हणूनच तुम्ही वारंवार नोकऱ्या बदलत राहता असा लोकांचा समज होऊ शकतो.

एकूणच काय नोकरी बदलणं वाईट नाही मात्र वारंवार नोकरी बदलल्यामुळे तुमच्या प्रोफाईलवर नकारात्मक परिणाम होऊ शकतो.

First published:
top videos

    Tags: Career, Jobs