मुंबई 17 जून: तुमच्यापैकी बऱ्याच जणांना आठवत असेल, की 90च्या दशकात लग्नात फोटोग्राफी करणारे फोटोग्राफर्स (Photographers) जेवणाऱ्या पाहुण्यांचं हमखास फोटोसेशन (Photo Session) करायचे. आताच्याही काळातल्या फोटोग्राफर्सना तसे फोटो काढायला किंवा व्हिडिओ शूट करायला आवडत असल्याचं पाहायला मिळतं. आताच्या काळातली तरुणाई अशा व्हिडिओजना कॉमिकल ट्विस्ट (Comical Twist) देतेय. अशाच प्रकारची एक इन्स्टाग्राम रील (Instagram Reel) गेल्या आठवड्यात खूप व्हायरल झाली. त्यावरून हे दिसून आलं.
त्या रीलची सुरुवात होते लग्नसमारंभात बसून बिर्याणीचा आस्वाद घेत असलेल्या महिलेपासून. समारंभाला साजेसा पोषाख तिने परिधान केला आहे. ती तिच्या हातांनी बिर्याणीचा घास घेणार तेवढ्यातच तिच्या लक्षात येतं, की एक कॅमेरा आपल्या हालचाली टिपतो आहे. ते पाहिल्या पाहिल्या तिला जाणीव होते, की आपण आपल्या देशी पद्धतीने खातोय आणि ते कॅमेऱ्यात टिपलं जायला नकोय. ती लगेच सावध होते. हातातला घास ठेवून देते आणि जवळचा चमचा घेऊन चमच्याने खायला सुरुवात करते. आपण खात असताना शूटिंग होणार असेल, तर खाण्याचे एटिकेट्स/मॅनर्स पाळले गेले पाहिजेत, याचं भान ठेवून ती महिला तसं करते. कारण सध्याच्या काळात सोशल मीडियामुळे व्हिडिओ आणि फोटो कधी व्हायरल होईल हे सांगता येत नाही.
खांद्यावर हात ठेवला आणि...; नवऱ्याच्या मित्राने स्टेजवर केलं असं काही, पाहून नवरीही शॉक
View this post on Instagram
पोळ्या करणारी गावातील तरुणी ठरली सोशल मीडिया Sensation; 24 लाखांहून अधिक वेळा पाहिला गेला VIDEO
निरंजन महापात्रा यांनी हा व्हिडिओ इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. त्याला 58.3 हजाराहून अधिक व्ह्यूज थोड्याच कालावधीत मिळाले आहेत. त्यावर वेगवेगळ्या प्रकारच्या कमेंट्सही आल्या आहेत. 3133 जणांनी व्हिडिओ लाइक केला असून, 154 कमेंट्स आल्या आहेत.
एका युझरने कॅमेरामनला सल्ला दिला आहे, की त्या महिलेला त्याने डिस्टर्ब करू नये आणि निवांतपणे खाऊ द्यावं. एका युझरने आपल्या भारतीय संस्कृतीची आठवण त्या महिलेला करून दिली आहे. आपण भारतीय असल्याने हाताने जेवण्यात आपल्याला लाज वाटता कामा नये. हाताची बोटं ताटात जात नाहीत, तोपर्यंत खाद्यपदार्थांचा चांगल्या प्रकारे आस्वाद घेता येत नाही, असं त्या युझरने म्हटलं आहे. अनेक युझर्सनी कॅमेरामनबद्दल रोष व्यक्त केला आहे. लग्नसमारंभात कॅमेरामन नेहमीच खाण्याच्या वेळी अडथळा आणतात, असं मत अनेकांनी व्यक्त केलं आहे. कॅमेरामननी फोटो काढताना किंवा व्हिडिओ शूट करताना या गोष्टीचं भान ठेवलं पाहिजे, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Shocking video viral, Viral videos