मुंबई, 12 जून : सोशल मीडिया हे मजेदार व्हिडीओचा खजिना आहे. इथे तुम्हाला कधी काय पाहायला मिळेल हे काही सांगू शकत नाही. त्यात जुगाडाचे व्हिडीओ लोकांना पाहायला सर्वाधिक आवडते. तसे पहाता भारतात जुगाडू लोकांची कमी नाही ज्यामुळे असे व्हिडीओ सरास तुम्हाला पाहायला मिळतात. सध्या असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. हा व्हिडीओ आनंद महिंद्रा यांनी स्वत: शेअर केला आहे आणि त्यावर कमेंट देखील केली आहे. ते सोशल मीडियावर नेहमीच सक्रीय असतात आणि अशा प्रकारचे व्हिडीओ किंवा जुगाडांना ते नेहमीच प्रोत्साहन देत असतात. शेतात रोप लावण्यासाठी शेतकऱ्याने लावला देसी जुगाड, Video पाहून नक्कीच कराल कौतुक त्यांची एक अलीकडील पोस्ट वेगाने लोकांचे लक्ष वेधून घेत आहे, ज्यामध्ये एक माणूस खाटेपासून बनवलेली कार चालवताना दिसत आहे, जे पाहून तुम्हीही थक्क व्हाल. हा मजेदार व्हिडीओ 10 जून रोजी सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर शेअर करण्यात आला आहे, ज्यामध्ये एका व्यक्तीने खाटेपासून देसी जुगाडातून चार चाकांची गाडी बनवली आहे. हो तुम्ही बरोबर वाचलत, जुन्या पद्धतीच्या खाटेचा वापर करुन या व्यक्तीने कार बनवली आहे. तुम्हाला विश्वास बसत नसेल तर हा व्हिडीओ पाहा.
I must have received this video from at least from ten friends. I didn’t RT it because it seemed more like a prank jugaad to get attention & also violates most regulations. But to be honest, I never thought about the application you have referred to. Yes, who knows, it could turn… https://t.co/MmF9rrVqfk
— anand mahindra (@anandmahindra) June 10, 2023
आनंद महिंद्रा आपल्या सोशल मीडियावर हा व्हिडीओ शेअर करत आपल्या कॅप्शनमध्ये लिहिले की, ‘‘मला हा व्हिडीओ किमान दहा मित्रांकडून मिळाला असेल. हा व्हिडीओ लक्ष वेधून घेण्यासाठी केलेला एक जुगाड असू शकतो. शिवाय हे बऱ्याच नियमांचे उल्लंघन करत आहे. पण खरं सांगायचं झालं तर हा प्रयोग दुर्गण आणि अपवादात्मक भागात जीवनरक्षक (संजीवनीसारखे) ठरू शकते.’’ Jugad : एकापेक्षा एक भन्नाट देसी जुगाड, Viral फोटो पाहून चक्रावाल व्हिडीओमध्ये, एक व्यक्ती पेट्रोल पंपावर खाटांपासून बनवलेले वाहन चालवताना दिसत आहे, ज्याला इंजिन आणि चार चाकांसह देसी जुगाड वापरून अनोख्या पद्धतीने डिझाइन केले आहे. या खाटेवर नियंत्रण ठेवण्यासाठी त्यात स्टीयरिंग व्हीलही बसवण्यात आले आहे. हा व्हिडीओ कधी आणि कुठे बनवला गेला याची पुष्टी अद्याप झालेली नाही. या पोस्टला आतापर्यंत हजारो लोकांनी लाईक केले आहे. त्याच वेळी, ज्या युजर्सनी ही पोस्ट पाहिली आहे ते त्यावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत.