मुंबई, 07 जून : सोशल मीडियावर नेहमीच असंख्य असे व्हिडीओ तुम्हाला पाहायला मिळतील. हे व्हिडीओ इतके मनोरंजक असतात की ते पाहण्यात वेळ कसा निघून जातो हेच कळत नाही. हे कधी तुम्हाला पोटधरुन हसायला लावतात. तर कधी काही व्हिडीओ हे अंगावर काटा आणणारे असतात. तर काही व्हिडीओ आपण कोणत्याही कारणाशिवाय पाहात राहातो. असाच एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. हा व्हिडीओ एका जुगाडाचा व्हिडीओ आहे, जो नेटकऱ्यांना देखील आवडला आहे. ज्यामुळे हा व्हिडीओ ट्रेंड होऊ लागला आहे. या व्हिडीओमध्ये काही तरुणांनी बाजूवाल्या घरातील कोंबडीला पकडून त्याचं चिकन डिनर करण्याचं ठरवलं आणि त्यासाठी त्यांनी जुगाड देखील लावला. तुम्ही कधी कोंबडी पकडण्याचा प्रयत्न केला असेल तर तुमच्या लक्षात आलं असेल की कोंबडी सहजासहजी हाताला लागत नाही. तिला पकडण्यासाठी खूप मेहनत घ्यावी लागते. पण जेव्हा कोंबडी स्वत:च या तरुणांच्या घरात येते, तेव्हा मात्र ते मेजवान करण्याचं मनात ठरवूनच टाकतात. या व्हिडीओच्या सुरुवातीला आधी काय सुरु आहे हे तुम्हाला कळणार नाही. पण जेव्हा तुम्हाला कळेत तेव्हा हा व्हिडीओ तुम्हाल पोट धरुन हसायला भाग पाडेल.
या व्हिडीओत दरवाजाच्या पाठी लपलेले दोन तरुण दिसतील. तेव्हा दरवाजात दोन कोंबड्या असतात. खरंतर या तरुणांनी दाने टाकून शेजारच्या कोंबड्यांना घरात बोलवले होते. त्यानंतर जेव्हा कोंबड्या दाने खाण्यात व्यस्त होतात, तेव्हा त्याचा फायदा घेत दरवाजामागील तरुण दरवाजा बंद करतात. त्यानंतर ही मुलं आनंदी होतात आणि कोंबडी पकडतात. ज्यामुळे त्यांना चिकन डिनर करणं सोपं झालं. हा मजेदार व्हिडिओ यूजर्सना खूप आवडला आहे, ज्यावर त्यांच्या अनेक प्रतिक्रियाही पाहायला मिळत आहेत. इंस्टाग्रामवर व्हायरल होत असलेल्या या व्हिडीओवर आतापर्यंत अनेक युजर्सनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. अशा स्थितीत एका यूजरने आनंद घेताना लिहिले की, दोन दिवस भाऊंचे काम झाले. त्याचवेळी आणखी एका यूजरने लिहिले की, खूप धोकादायक लोक आहेत. या व्हिडिओला आतापर्यंत लाखो लाईक्स मिळाले आहेत आणि हजारो वेळा शेअरही केले गेले आहेत. ज्यामुळे हा व्हिडीओ ट्रेंड होत आहे.