'...और अब पावरी नहीं हो रही हैं'; दिल्ली पोलिसांचं मजेशीर Tweet Viral

'...और अब पावरी नहीं हो रही हैं'; दिल्ली पोलिसांचं मजेशीर Tweet Viral

दिल्ली पोलिसांनी अवैधपणे सुरू असलेल्या एका हुक्का (Hookah) पार्लरवर छापा टाकत बार सील केला आहे. यादरम्यान दिल्ली पोलिसांनी मोठ्या प्रमाणात हुक्का आणि नशेचे पदार्थ जप्त केले आहेत.

  • Share this:

नवी दिल्ली 08 मार्च : दिल्ली पोलिसांचं एक ट्वीट (Viral Tweet of Delhi Police) सध्या चांगलंच व्हायरल होताना दिसत आहे. हे ट्वीट सध्या चर्चेचा विषय ठरलं आहे. प्रकरण असं आहे, की दिल्ली पोलिसांनी अवैधपणे सुरू असलेल्या एका हुक्का (Hookah) पार्लरवर छापा टाकत बार सील केला आहे. यादरम्यान दिल्ली पोलिसांनी मोठ्या प्रमाणात हुक्का आणि नशेचे पदार्थ जप्त केले आहेत. पोलिसांनी याचा एक फोटो ट्विटरवर शेअर करत लिहिलं, की ये हम हैं...ये हुक्के हैं...और अब पावरी नहीं हो रही हैं. दिल्ली पोलिसांचं हे मजेशीर ट्वीट पाहाता पाहाता चांगलंच व्हायरल झालं आहे.

स्थानिक पोलीस ठाण्यातील मिळालेल्या माहितीनुसार, रात्रीच्या वेळी गस्त घालत असताना 2 रेस्टॉरंट रात्री उशीरापर्यंत सुरू असल्याचं पोलिसांना दिसलं. यानंतर इथे पाहणी केल्यावर पोलिसांच्या असं लक्षात आलं,की कोरोना प्रतिबंधासाठीचे नियम याठिकाणी पायदळी तुडवले जात होते. इतकंच नाही तर रेस्टॉरंटमध्ये लोक मोठ्या प्रमाणात हुक्क्याचा धूर उडवत होते. पोलिसांनी दोन्ही रेस्टॉरंटच्या मॅनेजरकडे चौकशी केली तेव्हा ते पोलिसांना आतमध्ये जाण्यापासून अडवू लागले. अशातच पोलिसांनी त्यांच्यावर कारवाई केली.

ट्वीट मोठ्या प्रमाणात व्हायरल -

पोलिसांनी सांगितलं, की आतमध्ये अवैधरित्या सुरू असलेल्या हुक्का बारवर पडदा टाकण्यासाठी मॅनेजर पोलिसांन आडवत होता. अशात दिल्ली पोलिसांनी कारवाई करत रेस्टॉरंटवर छापा टाकला. यावेळी आतून मोठ्या प्रमाणात हुक्का जप्त करण्यात आला. दिल्लीमध्ये हुक्क्यावर बंदी असतानाही अवैधरित्या याठिकाणी हुक्का पार्टी सुरू होती. याच कारणामुळे दिल्ली पोलिसांनी ट्वीटरवर हुक्क्याचे फोटो टाकत सोबत मजेशीर मेसेज लिहिला. पोलिसांनी लिहिलं, की ''ये हम हैं...ये हुक्के हैं...और अब पावरी नहीं हो रही है...''. दिल्ली पोलिसांचं हे ट्वीट लोकांच्या केवळ पसंतीसच पडलं नाही तर मोठ्या प्रमाणात व्हायरलही झालं.

Published by: Kiran Pharate
First published: March 8, 2021, 12:45 PM IST

ताज्या बातम्या