नवी दिल्ली 29 जुलै : माणसाने प्राण्यांना नेहमीच आपल्यापेक्षा कमी मानलं आणि म्हणूनच त्यांची खूप शिकार केली. त्यांना त्रास सहन करण्यास भाग पाडलं. पण निसर्गाने त्यांना समान बनवलेलं आहे आणि निसर्गापुढे दोघेही समान आहेत. सध्या हेच दाखवणारा एक व्हिडिओ समोर आला आहे. जपानमध्ये सध्या मुसळधार पाऊस पडत आहे, अशात मनुष्य आणि प्राणी एकत्र येऊन एकाच ठिकाणी आश्रय घेताना दिसले. आपण कोणत्याही परिस्थितीत प्राण्यांपेक्षा बलवान किंवा कमकुवत नाही, आपण समान आहोत, याची जाणीव या व्हिडिओवरून होईल. उद्योगपती आनंद महिंद्रा ट्विटरवर खूप सक्रिय आहेत आणि अनेकदा आश्चर्यकारक व्हिडिओ पोस्ट करतात. अलीकडेच त्यांनी एक व्हिडिओ शेअर केला आहे. ज्यामध्ये हरीण आणि मानव एकाच ठिकाणी जमलेले दिसत आहेत. हा व्हिडिओ पोस्ट करत त्यांनी लिहिलं - “जपानमधील नारा येथे जंगली सिका हरण पावसाच्या वेळी त्या माणसांसोबत आश्रय घेत आहेत, ज्या माणसांवर त्यांचा विश्वास आहे. मी हा व्हिडिओ सेव्ह करून ठेवणार आहे आणि जेव्हा मला जग कसं असावं याची आठवण स्वतःला करून देण्याची गरज असेल तेव्हा मी तो पाहीन'.
Wild sika deer in Nara, Japan, taking shelter with humans they trust during a thunderstorm. I’m going to store this video & view it whenever I want to remind myself how the world SHOULD be… #WorldNatureConservationDay pic.twitter.com/wYKalbMUAC
— anand mahindra (@anandmahindra) July 28, 2023
व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकता की जपानच्या या शहरात किती मुसळधार पाऊस पडत आहे. काही मोजकीच वाहने रस्त्यावर धावताना दिसतात. दरम्यान, पावसापासून वाचण्यासाठी अनेक हरणे इमारतीखालील शेडमध्ये बसली आहेत. त्यांच्या आसपास अनेक लोकही आहेत जे पावसापासून बचाव करण्यासाठी तेथे आश्रय घेण्यासाठी आले आहेत. लोकांच्या भीतीने हरणं पळत नाहीत आणि त्यांना इजाही करत नाहीत. माणसंही त्यांचे फोटो काढताना दिसतात. Viral Video: दोघांच्या भांडणात तिसऱ्याचा लाभ; मांसाच्या तुकड्यासाठी भिडले 2 बिबट्या अन् शेवटी नको ते घडलं या व्हिडिओला 9 लाखांहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत तर अनेकांनी कमेंट करून आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. एकाने आनंद महिंद्रा यांना उद्देशून सांगितलं की त्यांच्याकडे इतकी संसाधने आहेत की ते जगात असे बदल घडवून आणू शकतात. एकाने म्हटलं की, तो काही वर्षांपूर्वी जपानला गेला होता, तेव्हाही त्याने तेच दृश्य पाहिले होते.