ओम प्रयास, प्रतिनिधी
हरिद्वार, 21 मार्च : उत्तराखंडमधील हरिद्वार जिल्ह्यात एक विचित्र घटना समोर आली आहे. कर्करोगाशी लढा देत असलेल्या एका व्यक्तीचा येथे मृत्यू झाला. यानंतर नातेवाईक त्याच्या अंत्यसंस्काराची तयारी करत होते. यावेळी तिरडीवर पार्थिव ठेवण्यात आले होते. मात्र, यावेळी एक धक्कादायक प्रकार घडला.
शेवटची आंघोळ करताना मृत व्यक्ती जिवंत झाला आणि थेट बोलू लागला. त्याला जिवंत पाहून सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला. यानंतर घाईघाईत त्याला दवाखान्यात नेण्यात आले. मात्र, रुग्णालयात पोहोचेपर्यंत त्याचा पुन्हा मृत्यू झाला आणि तपासणीनंतर डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.
ही घटना रुरकीच्या झबरेड़ा येथील आहे. दीपक कुमार (58) हे दीर्घकाळ कर्करोगाशी झुंज देत होते. सोमवारी सकाळी दीपक यांची प्रकृती अचानक बिघडली. नातेवाईकांनी त्यांना रुग्णालयात नेण्यापूर्वीच त्याचा मृत्यू झाला. मृत्यूची बातमी कळताच कुटुंबात शोककळा पसरली. यानंतर दीपकच्या अंत्यदर्शनासाठी नातेवाईकांना बोलावून घेतले.
अनेकदा सांगूनही ऐकलं नाही, मुलगी बॉयफ्रेंडसोबत फोनवर दिसली, अन् बापानं थेट विषयच संपवला
त्यानंतर मृतदेह घेऊन नातेवाईक गावात पोहोचले. त्यानंतर ग्रामस्थांची गर्दी झाली. दुपारी नातेवाईकांनी मृतदेहावर अंत्यसंस्कार केले. ही विचित्र घटना झबरेडा परिसरात चर्चेचा विषय ठरली आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Dead body, Local18, Uttarakhand