नवी दिल्ली 01 जुलै: कोरोनानं (Coronavirus) अनेकांना आपल्या कुटुंबीयांपासून कायमचं दूर केलं आहे. य़ामुळे अनेकांना आपल्या जवळच्या व्यक्तींशिवाय आयुष्य जगावं लागत आहे. मात्र, नुकतंच दोन मुलींना आपल्या वडिलांचा कोरोनानं मृत्यू झाल्यानंतर त्यांना खास पद्धतीनं श्रद्धांजली दिली आहे. वडिलांच्या मृत्यूनंतर या दोन्ही बहिणींनी आपल्या वडिलांचे शेवटचे शब्द स्वतःच्या शरीरावर कोरून घेतले आहेत. दोन बहिणींनी शरीरावर काढलेल्या या अनोख्या टॅटूचा व्हिडिओ (Viral Video of Special Tattoo) सध्या सोशल मीडियाच्या दुनियेत वेगानं व्हायरल होत आहे. सोशल मीडियावर या दोघींची कहानी ऐकल्यानंतर अनेकांनी यावर आपली प्रतिक्रिया दिली आहे. यासोबतच अनेकांनी यावर कमेंट (Comments) करत आपल्या जवळच्या माणसांना गमावल्याचं दुःख व्यक्त केलं आहे. वडिलांप्रतीचं अफाट प्रेम दाखवणारा हा व्हिडिओ इन्स्टाग्राम यूजर (Instagram User) अन्ना हर्पनं शेअर केला आहे. हा व्हिडिओ शेअर करत त्यांनी सांगितलं, की त्यांच्या वडिलांचं निधन पाच महिन्यांपूर्वी झालं होतं. रुग्णालयात (Hospital) असतानाच त्यांच्या वडिलांनी एका नोटमध्ये लिहिलं होतं, की ‘It has been such a good life’ पतीनेच केला पत्नीचा सौदा,गुप्तांगात मिरची पूड टाकून मित्रांकडून सामूहिक बलात्कार इंटरनेटवर सध्या मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये पाहायला मिळतं, की अन्ना आणि त्यांच्या बहिणीनं आपल्या वडिलांचे हे शेवटचे शब्द आपल्या शरीरावर टॅटूच्या माध्यमातून प्रिंट करून घेतले आहेत. वडिलांसोबतच्या आपल्या काही जुन्या फोटोंची क्लिपही अन्नानं शेअर केली आहे. या व्हिडिओ क्लिपमध्ये लिहिलं गेलं आहे, की त्यांच्या हास्याशिवाय आयुष्यात एक वेगळंच एकटेपण आहे. ते जे हास्य आणि प्रेम इतरांना देत, त्यासाठी मला अत्यंत अभिमान वाटतो की ते माझे वडील होते. मी त्यांना नेहमी मिस करेल.
6 फेऱ्यानंतर नवरीचा लग्नास नकार; नवरदेवाच्या कुटुंबीयांनी केली अजब मागणी सोशल मीडियावर हा व्हिडिओ 24 जून रोजी पोस्ट केला गेला आहे. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर लोकांनी यावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. अनेकांनी लिहिलं आहे, की हा व्हिडिओ कोणाचंही मन जिंकेल. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर अनेकजण भावुक झाले असून अनेकांनी स्वतःचे अनुभवही सांगितले आहेत. एका यूजरनं लिहिलं, की मुलींनी आपल्या वडिलांना दिलेली ही श्रद्धांजली आहे. तुमच्या वडिलांच्या निधनाचं अत्यंत दुःख आहे. मात्र, ते नेहमीच तुमच्यासोबत राहातील. एका युजरनं म्हटलं आहे, की हा मी आतापर्यंत पाहिलेल्या टॅटूमधील सर्वात खास टॅटू आहे.