वॉशिंग्टन, 28 जुलै : प्रिय व्यक्तीच्या मृत्यूनंतर ती परत यावी, असं वाटतं. पण एखाद्या व्यक्तीचा मृत्यू झाला की ती पुन्हा जिवंत होणं शक्य नाही. पण तुमचा एका निर्णय मृत व्यक्तीलाही जिवंत ठेवू शकतो. असाच निर्णय घेतला तो तीन बहिणींनी. ज्यांनी आपल्या वडिलांच्या मृत्यूनंतर एक निर्णय घेतला आणि चमत्कार झाला. 4 वर्षांनी त्यांचे मृत वडील पुन्हा जिवंत झाले. यूएसच्या कनेक्टिकटमध्ये राहणाऱ्या ती बहिणी. 2019 साली या बहिणींनी आपल्या डोक्यावरील वडिलांचं छत्र हरवलं. त्यांचे वडील एस्टेबन सॅंटियागो यांचं निधन झालं. पण त्याचवेळी त्या तिघींनी असा निर्णय घेतला की त्यांचे वडील पुन्हा जिवंत झाले. मृत्यूच्या चार वर्षांनी या लेकींनी त्यांच्या मृत वडिलांच्या हृदयाची धडधड ऐकली आणि त्यांच्या डोळ्यात पाणी आलं.
आता एखादी मृत व्यक्ती तिच्या हृदयाची धडधड कशी ऐकू येईल, तेसुद्धा इतक्या वर्षांनी…. आश्चर्याचा धक्का तर बसणारच ना. पण हे शक्य आहे ते एका निर्णयाने जो या मुलींंनी वडिलांच्या मृत्यूनंतर लगेच घेतला. या मुलींनी वडिलांच्या मृत्यूनंतर घेतलेला तो निर्णय म्हणजे अवयवदान. त्यांनी आपल्या वडिलांच्या मृत्यूनंतर त्यांचं हृदय दान केलं. लेकीच्या लग्नाआधी आईची विचित्र इच्छा! मुलीला 100 तरुणांसोबत करायला लावलं ‘हे’ काम; दिले 40 हजार या तीन बहिणींपैकी एक असलेली किसांद्रा सॅंटियागो जिने ठरवलं होतं की ज्यांना आपल्या वडिलांचं हृदय दिलं आहे, त्यांना आपण शोधून काढणारच आणि तिनं ते केलंच. किसांद्राच्या वडिलांचं हृदय पीटर टेरझर नावाच्या व्यक्तीच्या छातीत धडधडत होतं. 2016 साली त्याचा रस्ते अपघात झाला होता. त्याच्यावर अनेक शस्त्रक्रिया झाल्या. शस्त्रक्रियेदरम्यान त्याला हृदयविकाराचाही सामना करावा लागला. ओपन हार्ट सर्जरी करून त्याचे प्राण वाचले. पण त्यानंतरही त्याला अनेक समस्यांचा सामना करावा लागला. 2019 साली डॉक्टरांनी त्याला हार्ट ट्रान्सप्लांट म्हणजे हृदय प्रत्यारोपणाचा सल्ला दिला आणि योगायोगाने त्यांना एस्टेबनचं हृदय मिळालं. एलिस्टेनच्या मृत्यूच्या चार वर्षांनी किसांद्रा पीटरला भेटली. त्याच्या छातीत तिने आपल्या हृदयाची धडधड ऐकली आणि तिला गहिवरून आलं. दर महिन्याचा पगार द्यायची आईला; 12 वर्षांनी बँक अकाऊंट पाहिलं आणि लेकीला बसला जबर झटका टुडे शो नावाच्या इन्स्टाग्राम पेजवर ही स्टोरी शेअर करण्यात आली आहे. यावर बऱ्याच कमेंट येत आहेत. अनेकांनी याला चमत्कार म्हटलं आहे.