नवी दिल्ली, 2 जानेवारी : सासू-सून म्हटलं, की केवळ भांडण हाच शब्द समोर येतो. लग्नानंतर अनेक सुनांना सासू घरात नकोशी असते. अशा परिस्थितीत एका सुनेने आपल्या सासूसाठी येवढा सुंदर डान्स केल्यामुळे त्या सुनेचे सोशल मीडियावर विशेष कौतुक होत आहे. त्यातही नृत्य कला काही जणांना फार छान जमते. काही जण शास्त्रशुद्ध शिक्षण घेतलेलं नसलं, तरी फार सुंदर डान्स करतात. असाच एका महिलेने केलेला डान्स सध्या फार चर्चेचा विषय बनला आहे. विशेष म्हणजे या महिलेने हा डान्स आपल्या सासूसाठी केलेला आहे.
हा सुंदर डान्स व्हिडिओ इन्स्टाग्राम युझर उर्वीकर चौधरी हिने शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये 'हम साथ साथ है' या बॉलिवूड चित्रपटातल्या 'मैया यशोदा' या गाण्यावर उर्वी डान्स करत आहे. तिने त्यात लाल रंगाची साडी परिधान केली आहे. त्यामुळे ती खूपच सुंदर दिसत आहे. तिच्या समोर सोफ्यावर तिची सासू बसून उर्वीचा डान्स पहात आहे. आजूबाजूला आणखी काही महिला बसलेल्या असल्याचं व्हिडिओमध्ये स्पष्ट दिसत आहे.
घरातल्या एका छोट्याशा कार्यक्रमादरम्यान काही महिला उर्वीच्या घरी जमल्या होत्या. तेव्हा अचानक कोणी तरी मैया यशोदा हे सुंदर गाणं लावलं. हे गाणं कानावर पडल्यावर उर्वीला डान्स करण्याचा मोह आवरता आला नाही व तिने गाण्याचे शब्द गुणगुणत डान्स करायला सुरुवात केली. ती डान्स एवढ्या अचूकपणे व सुंदर करत होती, की ते पाहून तिथे जमलेले सर्व जण तिच्याकडे एकटक पाहतच राहिले. तेव्हा अचानक एक महिला उठली व तिने उर्वी व तिच्या सासूच्या चेहऱ्यावरून काही पैसे ओवाळले व बाजुला असलेल्या एका महिलेकडे दिले.
नवरी नाही तर मेहुणीचं नवरदेवासोबत विचित्र कृत्य, पाहून सगळेच थक्क, लग्नातील VIDEO
सोशल मीडियावर हा व्हिडिओ खूप आवडीने पाहिला जात आहे. हा व्हिडिओ उर्वीने 22 नोव्हेंबरला आपल्या इन्टाग्राम अकाउंटवरून शेअर केला होता. जवळपास 4.4 मिलियनपेक्षाही अधिक व्ह्यूज या व्हिडिओला मिळाले आहेत. हा व्हिडिओ शेअर करताना उर्वीने कॅप्शनमध्ये असं लिहिलं आहे, की "हा एक उत्स्फूर्त डान्स होता. मी या डान्सची विशेष अशी तयारी केलेली नव्हती. माझ्या मैत्रीणींनी अचानक गाणं लावलं आणि मी त्यावर गुणगुणत डान्स करायला लागले. त्या वेळी सर्वजण खूप भावूक झाले होते."
View this post on Instagram
आपल्या सुनेने एवढा सुंदर डान्स केल्यामुळे सासूसह सर्व महिला खूप भावूक झालेल्या या व्हिडिओमध्ये पाहायला मिळतात. हा व्हिडिओ पाहून "सासू-सुनेचं नातं असं आपुलकीचं असायला हवं" अशा प्रकारच्या प्रतिक्रिया अनेक युझर्सनी व्यक्त केल्या आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.