नवी दिल्ली, 26 मे : ‘मी या जगात आलेच का?’, ‘माझा जन्म का झाला?’, संकटात अशी तक्रार आपण अनेकदा करतो. काही लोक तर ‘तुम्ही मला जन्माला का घातलं?’, असा थेट जाब आपल्या पालकां नाच विचारतात. पण तुम्हाला वाचूनच धक्का बसेल. एका मुलीने तर यावरून चक्क आपल्या जन्मदात्यांविरोधात केसच ठोकली आहे. माझ्या परवानगीशिवाय मला जन्म का दिला म्हणत तिने पालकांविरोधात केस केली आहे. आपल्या जन्मावरून पालकांविरोधात केस ठोकणाऱ्या या मुलीचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. मुलीने स्वतःच तिच्या सोशल मीडियावर आपला हा व्हिडीओ पोस्ट केला आहे. ज्यात तिने आपल्याला जन्म दिला म्हणून आपण आपल्या पालकांविरोधात केस केल्याचं सांगितलं आहे. कास थियाज असं या महिलेचं नाव आहे.
व्हिडीओमध्ये थियाज म्हणते, ती या जगात फक्त तिच्या पालकांमुळे आहे. जर त्यांनी तिला या जगात आणलं नसतं, तर ती आता तिथं आली नसती आणि सर्व प्रकारच्या समस्यांना तोंड द्यावं लागलं नसतं. शेवटी माझ्या परवानगीशिवाय त्यांनी मला जन्म कसा दिला. मला जन्म घ्यायचा आहे की नाही हे जाणून घेण्याचा त्यांनी प्रयत्नही केला नाही. मला तेव्हा माहीत नव्हतं की मोठं झाल्यावर मला स्वतःला उदरनिर्वाह करण्यासाठी नोकरी करावी लागेल. मला आधी कळलं असतं तर कदाचित मी या पृथ्वीवर आले नसते. लेकीने रडणाऱ्या बाळाला शांत केलं अन् आजी-आजोबांना झाली अटक; नेमकं प्रकरण काय? मुलं होणं योग्य नाही. होय, जेव्हा तुम्ही एखादे मूल दत्तक घेतात तेव्हा मुलाला कोणासोबत जायचं हे कळते, असं ती म्हणाली. या व्हिडीओत तिने आपण आपल्या पालकांविरोधात केस केल्याचंही सांगितलं आहे. ते ऐकून सर्वांना धक्का बसला आहे. अनेकांनी तिच्याविरोधात संताप व्यक्त करत तिला ट्रोल केलं आहे. तू स्वतः आई असताना आईवडिलांची तक्रार कशी करू शकते, असा सवाल काही युझर्सनी तिला विचारला आहे. तर अनेकांनी तिला वाईट मुलगी म्हटलं आहे. आई-वडिलांशी भांडण अन् मुलाने रागात खोदला मोठा खड्डा, पुढे जे केलं ते कल्पनेच्या पलिकडचं @isatandstared इन्स्टाग्राम अकाऊंटवर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे.
या मुलीने आपल्या आईवडिलांसोबत जे केलं ते योग्य की अयोग्य यावर तुमचं मत काय? ते आम्हाला आमच्या सोशल मीडियाच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा.