वॉशिंग्टन, 04 डिसेंबर : मुलगी म्हणजे घरची लक्ष्मी, मुलगी म्हणजे धनाची पेटी असं म्हटलं जातं. एका महिलेच्या बाबतीत हे प्रत्यक्षात घडलं आहे. म्हणजे तिच्या घरी खरोखरच लक्ष्मीच्या पावलांनी लेक आली असं म्हणावं लागेल. कारण जसा तिने मुलीला जन्म दिला, त्याचदिवशी तिच्यावर पैशांचा पाऊस झाला. मुलीला जन्म दिला त्यादिवशीच ही महिला लखपती बनली आहे. लक्ष्मी रूपी लेकीने असा चमत्कार केला की तिची आई श्रीमंत झाली आहे.
अमेरिकेच्या नॉर्थ कॅरोलिनातील ही घटना आहे. 28 वर्षांच्या ब्रेंडाने 9 नोव्हेंबरला सकाळी एका मुलीला जन्म दिला. त्यानंतर तिचं नशीब फळफळलं. सकाळी मुलीचा जन्म आणि सायंकाळी तिला लॉटरी लागली.
मीडिया रिपोर्टनुसार ज्या दिवशी महिलेने मुलीला जन्म दिला त्याच दिवशी ती लाखो रुपयांची लॉटरी जिंकली. यूएस पॉवरबॉल लॉटरी ड्रॉमध्ये तिच्या नावाची घोषणा झाली. 80,000 पाउंड म्हणजे जवळपा, 80 लाख रुपयांची ही लॉटरी. टॅक्स वगैरे कपून तिच्या हातात 53 लाख रुपये आहे. 30 नोव्हेंबर रोजी ही रक्कम तिला ट्रान्सफर करण्यात आली.
हे वाचा - बाकी मुलांपेक्षा वेगळी दिसायची मुलगी; DNA टेस्ट करताच आईलाच बसला मोठा धक्का
महिलेने सांगितल्यानुसार ती आपल्या वाढदिवशी लॉटरी खरेदी करायची. पण आतापर्यंत तिला कधीच लागली नाही. पण मुलीचा जन्म होताच तिला ही लॉटरी लागली. त्यामुळे तिच्यासाठी हा चमत्कारच आहे.
द मिररच्या रिपोर्टनुसार आपली मुलगी आपल्यासाठी लकी चार्म ठरली असं ही महिला सांगते. ती म्हणाली, माझ्या मुलीने माझं नशीब बदलून टाकलं. मी आता आयुष्यभर तिची आभारी असेन. माझ्यासाठी ती लकी चार्म आहे.
हे वाचा - 'मला थोडी दारू प्यायला द्या'; वडिलांकडे हट्ट करणाऱ्या मुलाचा Video होतोय व्हायरल
मी जितकी आनंदी आहे, त्यापेक्षा जास्त आनंदी आणि आश्चर्यचकित माझं कुटुंब आहे. या पैशांतून मीसर्वात आधी कर्ज फेडणार आहे आणि त्यानंतर उरलेल्या पैशांनी कुटुंबाचं भविष्य सुरक्षित करणार आहे, असल्याचं ती म्हणाली.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Daughter, Mother, Small baby, Viral, Viral news