मराठी बातम्या /बातम्या /Viral /

'मला थोडी दारू प्यायला द्या'; वडिलांकडे हट्ट करणाऱ्या मुलाचा Video होतोय व्हायरल

'मला थोडी दारू प्यायला द्या'; वडिलांकडे हट्ट करणाऱ्या मुलाचा Video होतोय व्हायरल

मला दारू द्या म्हणणाऱ्या मुलाचा व्हिडीओ व्हायरल

मला दारू द्या म्हणणाऱ्या मुलाचा व्हिडीओ व्हायरल

या व्हिडिओत एक लहान मुलगा दारू प्यायला मिळावी, म्हणून रडताना दिसत आहे. हा व्हिडिओ खूप मजेदार, मनोरंजक पण काहीसा विचार करायला लावणारा आहे.

  • Trending Desk
  • Last Updated :
  • Mumbai, India

 मुंबई, 04 डिसेंबर : सोशल मीडियावर रोज वेगवेगळ्या कंटेटचे व्हिडिओ व्हायरल होत असतात. यापैकी काही व्हिडिओ नेटिझन्सकडून चांगलीच वाहवा मिळवतात. सध्या असाच एक व्हिडिओ जोरदार व्हायरल होत आहे. या व्हिडिओत एक लहान मुलगा दारू प्यायला मिळावी, म्हणून रडताना दिसत आहे. हा व्हिडिओ खूप मजेदार, मनोरंजक पण काहीसा विचार करायला लावणारा आहे. कारण मद्यपान हे शरीरासाठी घातक मानलं जातं. अल्कोहोलमुळे अनेक गंभीर आजार होण्याची शक्यता असते. त्यामुळे लहान किंवा अल्पवयीन मुलांनी अल्कोहोलपासून दूर राहावं, असा सल्ला वैद्यकीय तज्ज्ञ देतात. या पार्श्वभूमीवर या लहान मुलाच्या व्हिडिओची जोरदार चर्चा होत आहे.

मद्यपानामुळे गंभीर आजार होऊ शकतात. मद्यपानाचा थेट परिणाम मेंदूसह अन्य अवयवांवर होतो. यामुळे शारीरिक संतुलनही बिघडतं. या शिवाय अल्कोहोलमुळे किडनीवर परिणाम होतो आणि डायबेटिसचा धोका वाढतो. त्यामुळे डॉक्टर प्रमाणापेक्षा जास्त मद्यपान न करण्याचा सल्ला देतात. लहान किंवा अल्पवयीन मुलांनी कदापि दारू पिऊ नये, असं सांगितलं जातं. पण सोशल मीडियावर सध्या जो व्हिडिओ व्हायरल होत आहे, त्यात एक लहान मुलगा दारू मिळावी, यासाठी रडताना दिसत आहे. हा मजेदार व्हिडिओ @Gulzar_sahab या ट्विटर आयडीवरून शेअर केला गेला आहे. 'थोडी दारु प्यायची आहे', असं या व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये लिहिलं आहे. 20 सेकंदाचा हा व्हिडिओ आतापर्यंत 1 लाख 11 हजारांपेक्षा जास्तवेळा पाहिला गेला आहे.

हेही वाचा -  VIDEO: एक वर अन् 2 वधू; जुळ्या बहिणींची एकाच तरुणासोबत सप्तपदी, सोलापूरकर शॉक!

सुमारे तीन हजारांपेक्षा जास्त युजर्सनं हा व्हिडिओ लाइक केला आहे. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर युजर्सनं वेगवेगळ्या कमेंटस केल्या आहेत.

'मुलांसमोर दारू पिण्याचे हे परिणाम आहेत', असं काही युजर्स कमेंटमध्ये म्हणतात. 'आई-वडील मद्यपान करत असतील आणि मुलांनाही देत असतील त्यामुळेच हा लहान मुलगा असं करत आहे', असं काही युजर्सनं म्हटलं आहे. 'घरातली मोठी माणसं दारू पित असतील तर ते मुलांवर वेगळे काय संस्कार करणार', असा प्रश्न एका युजरनं उपस्थित केला आहे. काही युजर्स याला नवी पिढी असं म्हणत आहेत.

या व्हिडिओत, एक लहान मुलगा रडताना दिसत आहेत. यावेळी त्याचे वडील बेटा तुला काय पाहिजे, असा प्रश्न विचारत आहेत. त्यावर तो मुलगा मला थोडीशी दारू प्यायची आहे, असं उत्तर देत जोरजोराने रडताना दिसतो. तसेच तो रडताना एक ते दोन वेळा मला थोडी दारु द्या, असं त्याच्या वडीलांना सांगताना दिसत आहेत. खरंतर एखाद्या खेळण्यासाठी लहान मुलं रडताना आपण पाहिली आहेत. मात्र रडत रडत वडीलांकडे पिण्यासाठी दारू मागणारा लहान मुलगा कदाचित कुणीही पाहिला नसेल. दारू ही वाईट असते, हे या मुलाला माहिती नसावं, त्यामुळेच तो दारू पिण्यासाठी रडत असावा. खरंतर दारूमुळे होणारे तोटे आणि दारू का पिऊ नये, याविषयी पालकांनी मुलांना माहिती देणं गरजेचं आहे. मात्र काहीही असलं तरी या व्हिडिओची मजा घेण्यास काहीच हरकत नाही

First published:

Tags: Video viral, Viral news