मुंबई 01 ऑगस्ट : जगभरातील तुरुंगांमध्ये कैद्यांना वेगवेगळी वागणूक दिलेली पाहायला मिळते. काही ठिकाणी कैद्यांचं आयुष्य हे नरकासमान होऊन जातं, तर काही देशांमधील कैद्यांना मिळणारी वागणूक पाहून तिथेच राहणं परवडलं, असं एखाद्याला वाटू शकतं. मात्र एका डेटिंग वेबसाईटने चक्क जेलमधील महिला कैद्यांना बाहेरच्या जगातील पुरुषांशी डेटिंग (Dating women in Jail) करण्याचा पर्याय उपलब्ध करून दिला आहे. वाचताना कितीही अजब वाटत असलं, तरीही ही गोष्ट पूर्णपणे खरी आहे.
खास डेटिंग वेबसाईट
डेटिंग वेबसाईट या साधारणपणे एकसारखी आवड, रुची असणाऱ्या दोन व्यक्तींना एकमेकांना भेटवण्याचं काम करतात. तुम्ही टिंडर वगैरे अशा डेटिंग अॅप्सबद्दल (Dating Apps) ऐकलंच असेल. अशाच प्रकारची एक डेटिंग वेबसाईट आहे, ‘वुमेन बिहाईंड बार्स’. या वेबसाईटने (Women Behind Bars) तुरुंगातील महिला कैद्यांना बाहेरच्या जगातील व्यक्तींशी डेटिंग (Website that allows women prisoners to date) करण्याची संधी उपलब्ध करून दिली आहे. त्यासाठीच ही वेबसाईट खास पद्धतीने डिझाईन करण्यात आली आहे.
तुरुंगात राहूनच करावं लागेल डेटिंग
दी मिररने याबाबत दिलेल्या रिपोर्टनुसार, तुरुंगातील कैद्यांना भावनिक आणि मानसिक आधार देण्याच्या उद्देशाने ही वेबसाईट (Dating website for women prisoners) तयार करण्यात आली आहे. तुरुंगातील कैद्यांनी आयुष्याकडे आणखी सकारात्मक दृष्टीनं पहावं, आणि तुरुगांतून बाहेर पडल्यानंतर त्यांना जगण्यासाठी एक आशेचा किरण मिळावा यासाठी हे पाऊल उचलण्यात आलं आहे. तुरुंगातून बाहेर पडल्यानंतर या कैद्यांनी नवं आयुष्य सुरू करावं यासाठी आपण हे करत असल्याचं या वेबसाईटनं सांगितलं आहे.
तुरुंगातील महिलांना डेटिंगसाठी बाहेर जाण्याची मुभा नसणार आहे. तुरुंगात राहूनच आपल्या डेटसोबत केवळ पत्रव्यवहाराच्या माध्यमातून (Pen-friends) त्यांना संवाद साधता येणार आहे. कोणत्याही प्रकारचं फिजिकल डेटिंग (o Physical Dating) करण्याची मुभा मिळणार नसल्याचं कंपनीनं स्पष्ट केलं आहे. यामुळेच ते या सुविधेसाठी अगदी कमी फी आकारत आहेत.
लग्नाआधी प्रेयसीने स्वतःचं घर घेतल्यानं प्रियकरानं तोडलं नातं; संपूर्ण प्रकरण जाणून बसेल धक्का
जगभरात अजब डेटिंग साईट्स
आजकाल सगळ्याच गोष्टी ऑनलाईन होत असताना, डेटिंग साईट्सना चांगले दिवस आले आहेत. सामान्य डेटिंग साईट्स व्यतिरिक्त कित्येक वेगळ्या डेटिंग साईट्सही (Bizarre dating sites) आता उपलब्ध झाल्या आहेत. ‘फरी मेट’ नावाची एक डेटिंग साईट माणसांना त्यांच्या आवडत्या प्राण्यासोबत भेट घालून देते. काही डेटिंग साईट्स एकसारख्या संगीताची आवड असणाऱ्यांना एकत्र आणतात, तर काही एकसारखी विनोदबुद्धी असणाऱ्यांना. एक डेटिंग साईट तर एकसारखी अॅलर्जी असणाऱ्या व्यक्तींना एकत्र आणण्याचं काम करते.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Dating app, Prisoners