Dadi Killer Smile Viral:या धकाधकीच्या जीवनात लोकांचं हसू देखील फेक (Fake Smile) होऊ लागलं आहे. आजकाल तर लोकांना हसण्यासाठीही खोटेपणा करावा लाहतो. हसू, स्माईल हे नेहमी आतून येतं. सध्या 104 वर्षांच्या आजाचं किलर हसू (Killer Smile) इंटरनेटवर व्हायरल होत आहे. आजीच्या फोटोची सोशल मीडियावर धूम (Dadi Smile Photo) आहे.
IAS अधिकाऱ्याने शेअर केला फोटो...
व्हायरल होत असलेला फोटो IAS अधिकारी अवनिश शरण यांनी आपल्या अधिकृत ट्विटरवर अपलोड केला आहे. एका दिवसांपूर्वी शेअर केलेला हा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या फोटोत आजी एका छोट्याशा आनंदानंतर हसताना दिसत आहे. फोटोत आजीच्या हसूचं कारण वाचून तुमच्याही चेहऱ्यावर स्मित हास्य उमटेल.
IAS अधिकाऱ्याच्या पोस्टनुसार, आजीचं वय 104 वर्षे आहे. आजी केरळ राज्यातील कोट्टायममध्ये राहते. नुकतच तिला 'केरल साक्षरता मिशन' टेस्ट मध्ये 100 पैकी 89 गुण मिळाले होते. यावेळी आजीने असंही सांगितलं की, शिकण्याचं कोणतं वय नसतं. फक्त तुमची इच्छाशक्ती असावी लागते.
104 year old Kuttiyamma from Kottayam has scored 89/100 in the ‘Kerala Literacy Mission’ test.
Look at her smile.❤️ pic.twitter.com/39Jwg5AoTJ
आजीचा हृदयस्पर्शी फोटो...
IAS अधिकाऱ्याने शेअर केलेल्या या फोटोचं लोक कौतुक करीत आहे. एका दिवसापूर्वी शेअर केलेल्या या फोटोला आतापर्यंत 26 हजारहून अधिक लाइक्स मिळाले आहेत. तर 2000 पेक्षा अधिकांनी रिट्विट केलं आहे.
Published by:Meenal Gangurde
First published:
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.