नवी दिल्ली, 16 डिसेंबर: आपल्या लग्नात (Wedding) तोकडे कपडे घालून (Short dress) डान्स (Dance) करणारी नववधू (Bride) पाहणं, हे अनेक नेटिझन्स भारतीयांना पचलेलं दिसत नाही. भारतात नववधूची एक खास स्टाईल असते. अंगभर कपडे घालणं, हा त्यातील एका मोठा भाग. त्यामुळे वधू ही अंगभर कपड्यात आणि पारंपरिक पेहेरावात पाहण्याची सवय भारतीयांसह अनेक देशांतील नागरिकांना वर्षानुवर्षं जडली आहे. या नागरिकांनी जेव्हा तोकड्या कपड्यांत बेभान होऊन स्वतःचं लग्न एन्जॉय करणारी तरुणी पाहिली, तेव्हा त्यांचं चांगलंच पित्त खवळलं.
IS THAT THE BRIDE?!?!? pic.twitter.com/et8Ai6iWj3
— Detective Drip (@ImKindaFunny901) December 12, 2021
नववधूचा डान्स
व्हिडिओत दिसणारी वधू आणि वऱ्हाडी हे बाहेरच्या देशातील असल्याचं दिसतं. लग्नानिमित्त सांगितिक कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे आणि त्या कार्यक्रमात आपल्या पतीसोबत त्याची पत्नी थिरकत असल्याचं दिसतं. नृत्य हे खरं तर मानवाला लाभलेलं वरदान मानलं जातं. आपल्या भावना व्यक्त करणारं, मोकळं करणारं आणि मन शांत करणारं नृत्य अनेकांना आकर्षित करतं. त्यात लग्नासारखा आनंदाचा प्रसंग असेल, तर अनेकजण बेभान होऊन नाचत असतात. मात्र प्रत्यक्ष वधूनं सर्वांसमोर ठरलेला ठेका अनेकांना रुचलेला नसल्याचं त्यावर आलेल्या कमेंट्सवरून दिसून येत आहे.
चाहत्यांचा जोरदार प्रतिसाद
सुरुवातीला हा व्हिडिओ इन्स्टाग्रामवर प्रसिद्ध करण्यात आला होता. त्यानंतर आता तो ट्विटरवरही अपलोड करण्यात आला आहे. आतापर्यंत या व्हिडिओला 30 लाखपेक्षा अधिक लोकांनी पाहिलं आहे. पांढरं जॅकेट घालून खुर्चीवर बसलेला नवरा आणि डान्स करणारी वधू हा व्हिडिओ सध्या जोरदार व्हायरल होत आहे.
हे वाचा- 500 रुपयांच्या चॉकलेटनं बनवलं मालामाल! एका रात्रीत मिळाले लाखो रुपये
चित्रविचित्र प्रतिक्रिया
या व्हिडिओत अनेक चित्रविचित्र प्रतिक्रिया आल्या आहेत. ही पाहा नववधू, असं म्हणत एकाने मस्करी केली आहे, तर आपल्या लग्नात कसं एन्जॉय करायचं, हा प्रत्येकाचा अधिकार असल्याचं काहीजणांनी म्हटलं आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Bride, Dance video, Marriage, Video viral