मराठी बातम्या /बातम्या /विदेश /500 रुपयांच्या चॉकलेटनं बनवलं मालामाल! एका रात्रीत मिळाले लाखो रुपये

500 रुपयांच्या चॉकलेटनं बनवलं मालामाल! एका रात्रीत मिळाले लाखो रुपये

नेहमीप्रमाणे तिने सुपरमार्केटमधून एक चॉकलेट खरेदी केलं. मात्र हे चॉकलेटमध्ये लाखो रुपये लपले असतील, याची तिचा अजिबातच कल्पना नव्हती.

नेहमीप्रमाणे तिने सुपरमार्केटमधून एक चॉकलेट खरेदी केलं. मात्र हे चॉकलेटमध्ये लाखो रुपये लपले असतील, याची तिचा अजिबातच कल्पना नव्हती.

नेहमीप्रमाणे तिने सुपरमार्केटमधून एक चॉकलेट खरेदी केलं. मात्र हे चॉकलेटमध्ये लाखो रुपये लपले असतील, याची तिचा अजिबातच कल्पना नव्हती.

ब्रिटन, 15 डिसेंबर: एका महिलेनं (Woman) तिला आवडणारं चॉकलेट (Chocolate) खरेदी केलं आणि रातोरात ती श्रीमंत (rich) झाली. चॉकलेट आवडणारी अनेक माणसं नियमितपणे चॉकलेटची खरेदी करत असतात आणि त्याचा फडशा पाडत असतात. चॉकलेट आवडणाऱ्यांमध्ये (Chocolate lovers) केवळ लहान मुलंच नाही, तर अगदी तरुणांचा आणि वृद्धांचाही समावेश असतो. बाजारात येणारी नवनवी चॉकलेट्स खरेदी करणं, त्याची टेस्ट पाहणं आणि इतरांना ती शेअर करणं, हा अनेकांच्या लाईफस्टाईलचा भाग असतो. नियमितपणे चॉकलेटचं शॉपिंग करण्याची एक हौस एका महिलेला चांगलीच फायद्याची ठरली आहे. तिनं नुकतंच जे चॉकलेट खरेदी केलं, त्याने तिला मालामाल (Got millions) केलं आहे.

असे मिळाले लाखो रुपये

ब्रिटनमध्ये राहणारी 43 वर्षांची सियान वॉकर नावाची महिला हा हाडाची चॉकलेटप्रेमी. दर आठवड्याला सुपरमार्केटमध्ये गेल्यानंतर स्वतःसाठी आणि स्वतःच्या मुलांसाठी चॉकलेट खरेदी करणं, हा तिचा आवडीचा प्रकार. गेल्या आठवड्यातही तिनं नेहमीप्रमाणे एक 500 रुपयांचं चॉकलेट खरेदी केलं. ब्रिटनमधील ज्या नँटविच सुपरमार्केटमधून तिनं ही खरेदी केली, तिथे ऑफर सुरू होती. तिथे उपलब्ध असणाऱ्या अनेक चॉकलेटमध्ये एक चॉकलेट असं होतं, ज्यात गोल्डन तिकीट लपवण्यात आलं होतं. हे तिकीट ज्याला मिळेल, त्याला 5 लाख रुपयांचं गिफ्ट मिळणार होतं. हे चॉकलेट खात असताना महिलेला ते तिकीट मिळालं आणि आपल्याला 5 लाख रुपयांची लॉटरी लागल्याचा तिला अत्यानंद झाला.

हे वाचा - स्वयंपाक घरात मिळाला सिक्रेट दरवाजा, आत डोकावून पाहिले तर...

24 लकी ग्राहक

चॉकलेट कंपनीनं एकूण 24 चॉकलेट्समध्ये गोल्डन तिकीट ठेवले होते. त्यापैकी सियान वॉकर ही एक होती. चॉकलेट कंपन्यांमध्ये सध्या मोठी स्पर्धा आहे. बाजारात अनेक चॉकलेट कंपन्या आल्या असून ग्राहकांना आपल्याकडे आकर्षित करण्यासाठी वेगवेगळ्या ऑफर्स आणि योजना या कंपन्यांकडून आणल्या जात आहेत. साधारणतः प्रत्येकाला एका विशिष्ट कंपनीचंच चॉकलेट आवडत असतं. त्यामुळे ग्राहक इतर चॉकलेट्सकडे वळताना दिसत नाही. त्यात बाजारात नव्या आलेल्या चॉकलेटसाठी आपला जुना आणि आवडता ब्रँड सोडणं हे ग्राहकांच्या अनेकदा जिवावर येतं. त्यासाठीच आपल्या कंपनीच्या चॉकलेटकडे वळवण्यासाठी कंपन्यात अशा प्रकारची लॉटरी ऑफर देत असतात.

First published:

Tags: Britain, Lottery, Woman