मुंबई, 08 जून : सोशल मीडियावर प्राण्यांशी संबंधीत नेहमीच वेगवेगळे व्हिडीओ व्हायरल झालेले तुम्ही पाहिले असणार. हे व्हिडीओ कधी अंगावर काटा आणणारे असतात. तर काही व्हिडीओ हे आनंद देणारे असतात. असाच एका हत्तीचा व्हिडीओ समोर आला आहे. जो पाहून तुमच्या चेहऱ्यावर आनंद उमटेल आणि तुम्ही दिवसभराचा थकवा विसरुन जाल. सर्वात बुद्धिमान प्राण्यांच्या यादीत हत्तींचे नाव समाविष्ट आहे. तो माणसांप्रमाणे तुम्हाला काम करता दिसेल. तसेच त्याला चांगलं वाईट समतं, शिवाय हत्तीला प्रेमाची जाणीव देखील आहे. हत्तीला विद्युत तारा काळजीपूर्वक ओलांडल्याच्या तुम्ही पाहिलं असेल. तसेच हत्तीला पाईपने आंघोळ करताना देखील पाहिलं असेल. King Cobra : साप खरंच मीठाचं वर्तुळ पार करु शकतो का? व्हिडिओत जे घडलं त्याची कल्पना करू शकत नाही असाच एक क्यूट व्हिडीओ व्हायरल होत आहे. जो पाहून तुम्हाला आनंद होईल. प्राणीसंग्रहालय हे असे ठिकाण आहे जिथे केवळ लहान मुलेच नाही तर प्रौढांनाही भेट देण्याचा खूप आनंद होतो. प्रौढ देखील प्राणीसंग्रहालयात जातात आणि काही काळासाठी मुले बनतात. मुलांबद्दल बोललो तर ते काय करतील, हे सांगता येत नाही. ते खेळात काहीही करु शकतात. अनेकवेळा पालकांनाही मुलांच्या वागणुकीमुळे समस्यांना सामोरे जावे लागते. प्राणीसंग्रहालयात हत्ती पाहून, एका मुलाला कदाचित मजा आली असेल आणि त्याने आपला एक बूट काढून हत्तीच्या पिंजऱ्या फेकून दिला किंवा मग त्यामुलाकडू चुकून बूट पडलं असू शकतं. पण त्या लहान मुलाचा बुट हत्तीच्या पिंजऱ्यात पडला हे नक्की.
त्यानंतर खरं आश्चर्य घडलं कारण ते बुट हत्तीने स्वत: आपल्या सोंडेनी उचललं आणि त्या चिमुकल्याला परत केलं. सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल हा व्हिडिओ इन्स्टाग्रामवर पीपर नावाच्या अकाऊंटवरुन शेअर केला आहे. हा व्हिडीओ कुठचा आहे याबाबत कोणतीही माहिती दिलेली नाही. 14 एप्रिल 2023 रोजी शेअर केलेल्या व्हिडीओला आतापर्यंत लाखो व्ह्यूज आणि लाईक मिळाले आहेत. व्हिडीओवर अनेक लोकांच्या प्रतिक्रियाही येत आहेत.