जाहिरात
मराठी बातम्या / Viral / स्वतःहून मृत्यूच्या दारात गेला वृद्ध; मगरीने अचानक केला हल्ला, अन् मग..Shocking Video

स्वतःहून मृत्यूच्या दारात गेला वृद्ध; मगरीने अचानक केला हल्ला, अन् मग..Shocking Video

स्वतःहून मृत्यूच्या दारात गेला वृद्ध; मगरीने अचानक केला हल्ला, अन् मग..Shocking Video

वृद्ध माणसाला त्याच्या प्रयत्नांवर खूप विश्वास होता, परंतु त्याला माहित नव्हतं की हा डाव उलटू शकतो. त्याने मगरीवर कापड फेकलं आणि मग तिला पकडण्यासाठी पुढे निघाला.

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

मुंबई 17 मार्च : काही लोक अगदी जीवासोबत खेळून आणि नको तो धोका पत्करून असं काहीतरी काम करतात, जे त्यांना चांगलंच महागात पडतं. मग जेव्हा डाव पलटतो, तेव्हा तिथून पळ काढण्याशिवाय त्यांच्याकडे काहीच पर्याय उरत नाही. लोक धोकादायक प्राण्यांपासून अंतर ठेवूनच राहतात. जे तज्ञ आहेत ते अशा धोकादायक प्राण्यांच्या जवळ जातात. मात्र, सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या एका व्हिडिओने लोकांना थक्क केलं. यात एक माणूस मगरीला पकडण्यासाठी प्रयत्न करत होता, पण जेव्हा मगरीने हल्ला केला तेव्हा त्याची चांगलीच घाबरगुंडी उडाली.

जाहिरात

सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, एक व्यक्ती मोकळ्या मैदानात धोकादायक मगरीला पकडण्याचा प्रयत्न करत होता. मात्र, त्याने आधी धूर्त युक्ती खेळली आणि मगरीच्या डोळ्याजवळ आणि तोंडाजवळ कापड फेकलं. मगरीला पकडण्याचा प्रयत्न करणाऱ्या व्यक्तीचं वय खूप होतं. वृद्ध माणसाला त्याच्या प्रयत्नांवर खूप विश्वास होता, परंतु त्याला माहित नव्हतं की हा डाव उलटू शकतो. त्याने मगरीवर कापड फेकलं आणि मग तिला पकडण्यासाठी पुढे निघाला.

News18लोकमत
News18लोकमत

मगरीला पकडण्यासाठी तो मागून हळू गेला आणि मग पकडण्यासाठी तिच्या पाठीवर बसण्याचा प्रयत्न करू लागला. ही पद्धत त्याला कामी आली नाही आणि मगरीने लगेच त्याच्यावर हल्ला केला. सुदैवाने हा व्यक्ती तिच्या तावडीतून बाहेर आला आणि त्याचा जीव वाचला. या व्यक्तीने मगरीच्या तोंडावर लाथही मारली. मात्र, मगरीपासून अंतर राखून तो पळून जाण्यात यशस्वी झाला. काही सेकंदांचा हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. आतापर्यंत तो 2 लाखांहून अधिक वेळा पाहिला गेला आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात